
Third Mumbai News: "मुंबई आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे. गोल्डमन सॅक्ससारख्या जागतिक वित्तसंस्थेचे नवे कार्यालय महाराष्ट्रात उभारले जाणे ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळ, भक्कम बाजारपेठा आणि गुंतवणूक-अनुकूल वातावरणाची पुष्टी होते. ही घटना महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील नेतृत्व अधोरेखित करणारी आहे", असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (18 ऑगस्ट 2025) 'गोल्डमन सॅक्स'च्या मुंबई येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळेस ते बोलत होते.
इनोवेशन हब उभारणार: CM फडणवीस
खासगी क्षेत्रासोबत भागीदारीतून मुंबई महानगर क्षेत्राच्या विकासासाठी रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई उभारली जात असून तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे केंद्र, वैद्यकीय महाविद्यालय तसेच संशोधनासाठी आवश्यक सुविधा असलेले ‘इनोवेशन हब' उभारण्यात येणार आहेत. येथे क्वांटम कम्प्युटिंग तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित संशोधनास चालना दिली जाणार आहे.
(नक्की वाचा: What is Ladki Sunbai Yojana 'लाडकी बहीण' नंतर 'लाडकी सूनबाई! काय आहे नवी योजना? जाणून घ्या सविस्तर)
तिसरी मुंबई म्हणजे आर्थिक विकासाचा नवा अध्याय: CM फडणवीस
तिसऱ्या मुंबईची सध्याच्या मुंबईसोबतची कनेक्टिव्हिटी उत्तम असेल. कोस्टल रोड, अटल सेतू आणि काम सुरू असलेला वरळी-शिवडी लिंक रोड यामुळे या नव्या क्षेत्राचा विकास अधिक वेगाने होईल. सार्वजनिक-खासगी भागीदारीतूनच उत्तम विकास साधता येतो. येथे येणाऱ्या गुंतवणूकदारांना आवश्यक असलेल्या सर्व मंजुऱ्या शासन स्तरावरून जलदगतीने मिळतील. तिसरी मुंबई म्हणजे आर्थिक विकासाचा नवा अध्याय ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
🔸Inauguration of Goldman Sachs' new office in Mumbai at the hands of CM Devendra Fadnavis.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 18, 2025
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'गोल्डमन सॅक्स'च्या मुंबई येथील नवीन कार्यालयाचे उदघाटन.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'गोल्डमन सैक्स' के मुंबई में नए कार्यालय… pic.twitter.com/dZxiih0HXl
(नक्की वाचा: चिमुकल्या देवांशीवर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमुळे वाचला जीव)
मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन
महाराष्ट्र हे गुंतवणूक स्नेही राज्य आहे. 'इज ऑफ डुईंग बिजनेस' साठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. गुंतवणूकदारांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. काही अडचणी आल्यास, त्या तत्काळ सोडवल्या जात आहेत. त्यामुळे तिसऱ्या मुंबईच्या विकासात गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world