जाहिरात

3 मृतदेह झोळीत टाकले अन् 8 किलोमीटरची पायपीट,'त्या' गावात नक्की काय झालं?

गावात अतिसाराची साथ आहे. त्यात तीन जणांची तब्बेल जास्त खालावली. गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी झोळी करून या तीघांनाही दवाखान्यात घेवून जाण्याचा निर्णय घेतला.

3 मृतदेह झोळीत टाकले अन् 8 किलोमीटरची पायपीट,'त्या' गावात नक्की काय झालं?
बुलढाणा:

अमोल गावंडे

बुलढाणा जिल्ह्यातील गोमाल या गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे गाव अतिशय दुर्गम भागात आहे. गावात अतिसाराची साथ आहे. त्यात तीन जणांची तब्बेल जास्त खालावली. गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी झोळी करून या तीघांनाही दवाखान्यात घेवून जाण्याचा निर्णय घेतला. त्यातील एकाचा गावातच मृत्यू झाला. तर दोघांचा दवाखान्या पर्यंत पोहचण्या आधीच वाटेत मृत्यू झाला. त्यांना दवाखान्यात घेवून जातानाचा व्हीडिओ आता समोर आला आहे. जर गावात जाण्यासाठी पक्का रस्ता असता तर या तिघांनाही वेळेत दवाखान्यात पोहोचणे शक्य झाले असते. शिवाय त्यांचे जीवही वाचले असते. पण त्यांचा मृत्यू झाला. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 मध्यप्रदेशच्या सीमेवर गोमाल हे गाव आहे. अतीदुर्गम भागात हे गाव आहे. या गावामध्ये अतिसाराची लागण झाल्याने तीन जण दगावले आहेत. त्यांना वेळेत उपचार मिळू न शकल्यामुळे, दवाखान्यात जाताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. गावापासून दवाखान्यात जाण्याच्या ठिकाणापर्यंत पक्का रस्ता नाही. गावात कोणतंही वाहन येत नाही. त्यामुळे पायी जाण्या शिवाय पर्याय नाही. गोमाल गावापासून दवाखान्यात जाण्यासाठी आठ किलोमीटर चालावे लागते. त्या तिघांची तब्बेत बिघडल्यानंतर गावकऱ्यांनी झोळी करून चालत जाण्याचा निर्णय घेतला. पण वेळेत ते दवाखान्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. तिघांचाही वाटेत मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.  सागरीबाई हिरू बामण्या, वय 18, जिया अनिल मुजालदा , वय 02 वर्ष आणि रविना कालू मुजालादा ,वय 05 वर्ष यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - चिमुकल्यांचा मृतदेह आईबापानं खांद्यावर घेतला, 15 किलोमीटरची पायपीट 'त्या' लेकरांबरोबर काय झालं?

गोमाल गावात सध्या अतीसाराची साथ आहे. काही जण जळगाव जामोद इथं तर काही जण मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले आहेत. दरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही आरोग्य प्रशासनाला त्या रुग्णांचा मृत्यू कशामुळे झाला हे समजू शकलेले नाही. गावात खरोखर अतीसाराची साथ आहे का याची पाहाणी करण्यासाठी आता आरोग्य पथकही गावात दाखल झाले आहे. यासाथीने तीन जणांचे जीव गेल्याने गावात सध्या भितीचे वातावरण आहे. काही दिवसापूर्वी गडचिरोलीचाही असाच एक व्हीडिओ समोर आला होता. त्यात आई वडील हे आपल्या दोन लेकरांचे मृतदेह खांद्यावर घेवून चालत दवाखान्यात गेले होते. त्यानंतर आता बुलढाण्याचा हा व्हीडिओ समोर आला आहे. 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
दादाचा वादा! राष्ट्रवादी काँग्रेसचं नवं-कोरं गाणं आलं, गाण्यात काय काय?
3 मृतदेह झोळीत टाकले अन् 8 किलोमीटरची पायपीट,'त्या' गावात नक्की काय झालं?
clash between Deepak Kesarkar of Shiv Sena Shinde group and Rajan Teli of BJP in Sawantwadi Assembly
Next Article
सावंतवाडीत महायुतीतच जुंपली, मंत्र्याला थेट भाजप नेत्याचे आव्हान