
संकेत कुलकर्णी/ पंढरपूर
महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांसाठी एक मोठी खुशखबर पुढे येत आहे. तिरुपती बालाजी प्रमाणे आता पंढरपुरात विठ्ठलाचे देखील टोकन दर्शन सुरू होत आहे. दिलेल्या वेळेत अगदी काही मिनिटाच्या अंतरावरच विठ्ठलाचे दर्शन आता टोकन पद्धतीने सुलभ होणार आहे. याच टोकन दर्शनाची 15 जून रोजी प्रायोगिक तत्त्वावर चाचणी होती आहे.
गेल्या अनेक वर्षापासून विठ्ठलाचे टोकन दर्शन सुरू व्हावे अशी मागणी होत होती. त्यानुसार मंदिर समितीने टोकन दर्शन व्यवस्थापन निर्माण केली आहे. यासाठी टीसीएस कंपनीशी करार करून त्यांच्याकडून सॉफ्टवेअर प्रणाली देखील उपलब्ध करून घेतली.. याच माध्यमातून मंदिर समितीचे अधिकृत संकेतस्थळावरून टोकन दर्शनाचे बुकिंग होणार आहे. याच टोकन दर्शनाची प्रथम चाचणीला 1200 टोकन उपलब्ध होणार आहेत.
टोकन दर्शन प्रणालीच्या प्रथम चाचणी आज 14 जून रोजी सकाळी 10.00 पासून www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरून बुकींग सुरू करण्यात आले आहे. ऑनलाईन पध्दतीने तयार झालेले टोकन प्रिंट करून, निश्चित करून दिलेल्या वेळी श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, पंढरपूरच्या उत्तरेकडील मागीस बाजूस प्रवेश करून टोकनची पडताळणी करून भाविकांनी घ्यायची.
त्यानंतर भाविकांना दर्शनहॉलमध्ये प्रवेश दिला जाईल व वेळेनुसार थेट दर्शन रांगेत प्रवेश होऊन भाविकांचे सुलभ दर्शन होणार आहे. त्यासाठी मंदिरे समितीने टोकन दर्शनाचे स्वतंत्र प्रवेशद्वार आणि ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडपात प्रतीक्षा हॉल उभे केले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world