योगेश लाटकर, नांदेड
हिंगोली-नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. हळद काढण्यासाठी एक पुरुष आणि 9 महिला असे10 जण ट्रॅक्टरमधून निघाले होते. मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट कठडा नसलेल्या विहिरीत कोसळला. चालकाचं ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
घटनेची माहिती मिळाल्यानंतर नांदेड आणि वसमत ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गावकऱ्यांच्या मदतीने घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 3 जणांना वाचवण्यात यश आल आहे. तर 7 जण विहिरीत बुडाले, अशी माहिती तहसीलदारांनी दिली आहे.
(नक्की वाचा- Shirdi News : फाड-फाड इंग्रजी, डोळ्यात पाणी; शिर्डीत भीक मागताना सापडला ISRO चा अधिकारी)
मृतांची नावे
ताराबाई जाधव, धरूपता जाधव, मीना राऊत, ज्योती सरोदे, चौथराबाई पारधे, सरस्पती भूरड, सिमरन कांबळे यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर पुरुभाबाई कांबळे, पार्वती बुरड, सटवाजी जाधव यांना वाववण्यात यश आलं आहे.
मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटलं की, "नांदेड जिल्ह्यातील आसेगाव येथे आज सकाळी 11 महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या अपघातात काही महिलांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हिंगोली जिल्ह्यातील गुंजगाव येथील या महिला होत्या आणि शेतिकामासाठी त्या जात होत्या."
(नक्की वाचा- मूल दत्तक घ्या! 'अॅडव्हान्सचा राग...', तनिषा भिसेंच्या मृत्यूप्रकरणी मंगेशकर रुग्णालयाचा खुलासा)
"त्या विहिरीतून महिलांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून निवासी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यासह संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी आहे. 3 महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हिंगोली आणि नांदेड दोन्ही प्रशासनाच्या आम्ही संपर्कात आहोत.
मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल", अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.