ट्रॅव्हलची दुचाकीला जोरदार धडक, माय-लेकाचा जागीच मृत्यू

Wardha Accident : अपघात झाल्यानंतर वणी मार्गावर बस रस्त्याकडेला उभी करुन बस चालकाने तेथून पळ काढला. पोलिसांनी ट्रॅव्हल्स ताब्यात घेतली असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

निलेश बंगाले,वर्धा

भरधाव ट्रॅव्हल बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत माय-लेकाचा मृत्यू झाला आहे. वर्ध्याच्या हिंगणघाट रस्त्यावरील वणा नदीच्या पुलावर ही घटना घटना घडली आहे. घटनेनंतर बस चालक फरार झाला. पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून बस चालकाचा शोध घेत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आरती वाघमारे (55 वर्ष) आणि आकाश वाघमारे (28 वर्ष) अशी मृत माय-लेकांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश आईसोबत आपल्या दुचाकीवरुन हिंगणघाट येथे कामानिमित्त आला होता. 

(नक्की वाचा - पुण्यापाठोपाठ आता नागपुरातही वेगवान कारचा कहर, अल्पवयीन मुलानं 5 जणांना उडवलं)

काम आटोपून सायंकाळच्या सुमारास तो परत वर्धा येथे जाण्यासाठी निघाला. मात्र हिंगणघाट येथील वणा नदीच्या पुलावर नागपूर ते बँगलोरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकाली जोरदार धडक दिली.  बसच्या धडकेनंतर दोघेही दुचाकीवर खाली पडले. त्यानंतर ट्रव्हल्सचे मागीच चाक दोघांच्या डोक्यावरून गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. 

(नक्की वाचा - पत्नीच्या जाचाला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलने जीवन संपवलं, मुंबईतील धक्कादायक घटना)

अपघात झाल्यानंतर वणी मार्गावर बस रस्त्याकडेला उभी करुन बस चालकाने तेथून पळ काढला. पोलिसांनी ट्रॅव्हल्स ताब्यात घेतली असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही मृतदेह हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article