धावत्या स्कुटीवर कोसळलं मोठं झाड; आई-वडिलांसमोर मुलाची तडफड, उपचारदरम्यान मृत्यू

Nanded News : नांदेड शहरात ही घटना घडली. गुप्ता दांपत्य आपल्या 13 वर्षाच्या मुलासोबत श्रीनगर मुख्य रस्त्यावरून जात असताना अचानक मोठं झाड उन्मळून पडलं.

Advertisement
Read Time: 2 mins

योगेश लाटकर, नांदेड

धावत्या स्कुटीवर झाड पडून 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. आई-वडिलांसमोरच मुलाच्या अंगावर झाड पडलं. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यश पंकज गुप्ता असं मृत मुलाचं नाव आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरात ही घटना घडली. गुप्ता दाम्पत्य आपल्या 13 वर्षाच्या मुलासोबत श्रीनगर मुख्य रस्त्यावरून जात असताना अचानक मोठं झाड उन्मळून पडलं. वडील दुचाकी चालवत होते तर आई मागे आणि मुलगा यश मधे बसला होता. झाड मधे बसलेल्या मुलाच्या पायावरच कोसळले. वडील समोर फेकले गेले तर आई देखील दुचाकी आणि झाडामध्ये अडकली होती. 

(नक्की वाचा- पुणेकरांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे; धरणांमधील पाण्याचा विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता)

मुलाच्या पायावर झाड पडल्याने तो वेदनेने किंचाळत होता. आई-वडिलांनी मुलाला काढण्यासाठी खुप प्रयत्न केले. मात्र त्यांना सहज ते शक्य झालं नाही. त्यानंतर काही नागरिकांनी धाव घेत कसेबसे झाड थोडे वर उचलून मुलाला बाहेर काढले. तोपर्यंत महापालिकेचे कर्मचारी देखील पोहोचले. कटरच्या सहाय्याने झाड कापून बाजूला काढण्यात आले. 

(नक्की वाचा-  Satara News : चिमुरडीसह आईची कृष्णा नदीत उडी; मुलीचा मृतदेह सापडला)

गंभीर जखमी झालेल्या मुलाला तातडीने एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला, पायाला आणि कंबरेला गंभीर इजा झाल्याने मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने नांदेड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Topics mentioned in this article