राहुल कुलकर्णी, पुणे
पुणे शहराजवळील धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आज रात्री पुण्यात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. अशात धरणांमधील पाण्याचा विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठच्या भागात पुन्हा पाणी भरण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खडकवासला धरणातून आज रात्री 11 वाजता मुठा नदीपात्रातला विसर्ग वाढवण्यात येणार आहे. आज रात्री 5 हजार क्युसेकच्या ऐवजी 11 हजार 704 क्युसेक पाणी खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. पावसाच्या अंदाजावरून पाण्याच्या विसर्गात बदल करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने इशारा दिला आहे.
(नक्की वाचा- लवासात भूस्खलन, पावसामुळे 3 बंगले घसरले; दोघांचा मृत्यू)
पुणे जिल्ह्यातील धरणे 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. पुणे शहराजवळील खडकवासला धरण 80 टक्के, पानशेत 94 टक्के आणि टेमघर 78 टक्के एवढ्या क्षमतेने भरलेले आहे. तर पिंपरी चिंचवड शहराशी सलग्न असलेले पवना धरण 84 टक्के क्षमतेने भरले आहे. त्यामुळे पुढील पावसाळा कालावधीसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांनी सतर्क व दक्ष राहणे आवश्यक आहे.
(नक्की वाचा- Satara News : चिमुरडीसह आईची कृष्णा नदीत उडी; मुलीचा मृतदेह सापडला)
सखल भागातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी पात्रातील निषिद्ध क्षेत्रात उतरू नये, अशा सूचना पाटबंधारे विभागाने दिल्या आहेत. सद्यस्थितीत खडकवासला व पवना धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू असुन पावसाच्या प्रमाणानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्यात येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world