
सुनील दवंगे, प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीत गावा-गावातील यात्रेची एक वेगळी ओळख आहे. अशीच एक वेगळी धगधगती आणि थरारक श्रद्धेची परंपरा दरवर्षी अकोले तालुक्यातील कौठेवाडी या गावात पाहायला मिळते. बिरोबाच्या कठ्याची यात्रा नावानं ही यात्रा प्रसिद्ध असून केवळ धार्मिक नाही तर लोकपरंपरा, साहस आणि सामाजिक एकत्रतेचे प्रतीक मानली जाते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्र विविध संस्कृती आणि परंपरांनी जरी नटलेला असला तरी येथे वर्षानुवर्षे चालत आलेल्या रुढी, प्रथा - परंपरा अगदी श्रद्धेने जपल्या जातात. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कौठेवाडी येथेही ग्रामदैवत बिरोबा महाराजाच्या यात्रेची अत्यंत पुरातन परंपरा आहे. अक्षय तृतीयेनंतरच्या येणाऱ्या रविवारी याठिकाणी यात्रा भरते. यातील सर्वात महत्वाचा असतो तो धगधगत्या कठ्याचा थरार.

नवसपूर्ती झाल्यानंतर देवाला कठा वाहतात. ज्याच्या अंगात देव संचारतो तो उघड्या अंगाने तोंडात लिंबू ठेवून पेटता कठा अर्थात पेटत्या लाकडाने भरलेली मातीची घागर डोक्यावर घेवनू बिरोबाच्या मंदिराला प्रदक्षिणा मारतात. रात्रीच्या अंधारातील हा आगीच थरार पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक भक्त येतात. चित्तथरारक आणि लोळ तुटत पायाखाली येणारा निखारा, अंगावर ओघळणारे गरम तेल अशी काहीशी तेथील परिस्थिती असते.
नक्की वाचा - Kedarnath Yatra 2025: केदारनाथमध्ये 'बम बम भोले'चा गजर! मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी उघडले, पाहा सुंदर VIDEO
हाईक हाईक म्हणत घालतात फेरी
कठा म्हणजे एक विशिष्ट पद्धतीने तयार केलेली मातीची घागर.. जी तिच्या तळापासून कापलेली असते. या घागरीत खैराच्या आणि सागाच्या लाकड उभी रचत त्यात कापूर, कापूस भरला जातो आणि नंतर पेटवले जाते. ती राखाडी लाल निखाऱ्यांनी भरलेली घागर डोक्यावर ठेवून भक्त बिरोबाच्या मंदिराभोवती हाईक हाईक म्हणत फेरी घालतात. ढोल-ताशांचा गजर, आगपंखांचा प्रकाश देणाऱ्या कठ्यांची रांग याठिकाणी पाहायला मिळते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world