निलेश बंगाले, वर्धा:
Tukaram Mundhe FDA action controversy: राज्यात सध्या IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज कारवायांचे सत्र सुरु आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून कारभार स्विकारल्यापासून तुकाराम मुंडेंनी राज्यभरात कारवाईचा धडाका लावला आहे. मुंडेंच्या या कारवायांमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अशातच आता मुंडेंच्या या धडक कारवाईविरोधात वर्ध्यातील शेतकऱ्यांनी एल्गार केला आहे.
तुकाराम मुंडेंच्या कारवाईविरोधात एल्गार
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्विकारल्यानंतर एफडीएने गोरस भंडारवर कडक कारवाई केली. या कारवाईनंतर उत्पादन ठप्प झाल्याने शेतकरी व ग्राहक अडचणीत आले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून उत्पादन पूर्णपणे ठप्प असल्याने ६०० हून अधिक दूध उत्पादक शेतकरी व ५ हजारांहून अधिक ग्राहकांना याचा फटका बसला आहे. या कारवाईमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी तुकाराम मुंडेंना ५ हजार कार्ड पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
अन्न व औषधी प्रशासनाच्या नागपूर व वर्धा येथील अधिकाऱ्यांनी वर्ध्याच्या गो-संवर्धन गोरस भंडारची पाहणी करून अस्वच्छ प्रक्रिया आढळल्याने नोटीस बजावली व उत्पादन बंदचे आदेश दिले. यामुळे शेतकरी व ग्राहक प्रभावित झाले असून यावर आता नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ५ हजारांहून अधिक पोस्टकार्ड पाठवून एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, एफडीएच्या छाप्यानंतर गोरस भंडार येथील उत्पादन बंद आहे. गेल्या आठ दिवसांपासून उत्पादन पूर्णपणे ठप्प असल्याने याचा फटका ६०० हून अधिक दूध उत्पादक शेतकरी व ५ हजारांहून अधिक ग्राहकांना बसला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world