जाहिरात

Tuljapur Nagar Parishad : तुळजापूरचा गड भाजपने राखला, ड्रग्ज प्रकरणाच्या आरोपांनंतरही गंगणेंनी मैदान मारलं

Tuljapur Nagar Parishad Election Result 2025 : तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अतिशय चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

Tuljapur Nagar Parishad : तुळजापूरचा गड भाजपने राखला, ड्रग्ज प्रकरणाच्या आरोपांनंतरही गंगणेंनी मैदान मारलं
Tuljapur Nagar Parishad Election Result 2025 : तुळजापुरात भाजपा आमदार राणारणजितसिंह यांनी दबदबा कायम राखला आहे,
तुळजापूर:

ओंकार कुलकर्णी, प्रतिनिधी

Tuljapur Nagar Parishad Election Result 2025 : तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अतिशय चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपचे उमेदवार विनोद उर्फ पिंटू गंगणे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला आहे. या विजयामुळे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा आपल्या मतदारसंघात असलेला दबदबा पुन्हा एकदा दिसून आला आहे.

विरोधकांनी या निवडणुकीत ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर उचलून धरला होता. प्रचारादरम्यान या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले होते, मात्र मतदारांनी विकासाच्या मुद्द्याला आणि भाजपच्या नेतृत्वाला पसंती दिल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.

तुळजापूर नगरपरिषदेच्या या निवडणुकीत भाजपकडून पिंटू गंगणे आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अमर मगर यांच्यात थेट लढत झाली. मतमोजणीअंती पिंटू गंगणे यांनी अमर मगर यांचा 1770 मतांनी पराभव केला. निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वीच दोन्ही गटांमध्ये मोठा राडा झाला होता, ज्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या सर्व संघर्षावर मात करत गंगणे यांनी बाजी मारली आहे.

(नक्की वाचा : Ausa Nagar Parishad Result 2025 : फडणवीसांच्या 'खास' आमदाराचा 'होम ग्राऊंड'वर पराभव; औशात गुलाबी गुलालाची उधळण )

ड्रग्ज प्रकरणाची पार्श्वभूमी 

पिंटू गंगणे यांचे नाव तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत आले होते. या प्रकरणात ते एक आरोपी असून सध्या जामिनावर बाहेर आहेत. ऑगस्ट महिन्यात जेव्हा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तुळजापूर दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांनी गंगणे यांचा जाहीर सत्कार केला होता. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी 1865 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

त्यावेळी बावनकुळे यांनी गंगणे यांना जवळ बोलावून घेतलेला सत्कार राजकीय वर्तुळात वादाचा विषय ठरला होता. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या सत्कारामुळे ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर भाजपने त्यांना उमेदवारी दिली आणि आता ते निवडूनही आले आहेत.

( नक्की वाचा : Amaravati News : आमदार संजय खोडकेंना कारची धडक; मणक्याला बसला मार, हॉस्पिटलमधून दिला 'हा' संदेश, पाहा Video )

काय आहे तुळजापूर ड्रग्ज प्रकरण?

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणाने काही दिवसांपूर्वी मोठी खळबळ उडवून दिली होती. यामध्ये तुळजाभवानी मंदिराच्या काही पुजाऱ्यांची नावे समोर आली होती, जे विविध राजकीय पक्षांशी संबंधित असल्याचे बोलले जाते. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 35 आरोपींची नावे समोर आली असून, त्यातील 21 आरोपी फरार आहेत. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजा यांनी या प्रकरणातील आरोपी पुजाऱ्यांची यादी पोलिसांकडून मागवली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सावली निवडणुकीवर असतानाही जनतेने दिलेला कौल महत्वपूर्ण मानला जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com