जुन्या मुंबई-पुणे महामार्गानजिक बस-दुचाकीचा अपघात, महिलेचा मृत्यू; CCTV फुटेज समोर

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळ्यानजिक असलेल्या झारा रिसॉर्टजवळ हा भीषण अपघात झाला. नियत्रंण सुटल्याने दुचाकीने समोरून येणाऱ्या खाजगी बसला जोरदार धडक दिली.

जाहिरात
Read Time: 2 mins

सूरज कसबे, पिंपरी-चिंचवड

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावजवळ खंडाळानजित बस आणि दुचाकीच्या भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. दुचाकीवरुन निघालेल्या पती-पत्नी पैकी पत्नीचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. तर पती गंभी जखमी आहे. या अपघातात अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. 

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळ्यानजिक असलेल्या झारा रिसॉर्टजवळ हा भीषण अपघात झाला. नियत्रंण सुटल्याने दुचाकीने समोरून येणाऱ्या खाजगी बसला जोरदार धडक दिली. दुचाकीवर असलेल्या सुरेखा सनस यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर पती आनंद सनस गंभीर जमखी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

(नक्की वाचा- मुंबईतील धक्कादायक प्रकार, टॉर्चच्या प्रकाशात महिलेची प्रसूती; आईसह अर्भकही दगावलं!)

सुरेखा सनस यांच्या अंगावरुन बसचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान हा अपघात घडला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांनुसार, आनंद आणि सुरेखा वेगाने एका वळणावरुन येताना दिसत आहे. मात्र दुचाकी वेगात असल्याने त्यावरचं नियंत्रण सुटलं आणि थेट बसला जाऊन धडकली. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement

( नक्की वाचा- मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बर्निंग बसचा थरार, बसमध्ये होते 36 प्रवासी; पुढे काय घडले?)

Jalgaon Accident
Photo Credit: Jalgaon Accident

जळगावात कार-दुचाकीच्या धडकेत दोघांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील कोचूर गावाजवळ भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर भरधाव कार देखील नाल्यात कोसळली. अपघातात मृत झालेले दोघेही रावेर तालुक्यातील चिनावल या गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे.  अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. या अपघाताप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

Topics mentioned in this article