जाहिरात
Story ProgressBack

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बर्निंग बसचा थरार, बसमध्ये होते 36 प्रवासी; पुढे काय घडले?

Mumbai Pune Express Highway: बसमधून 36 जण प्रवास करत होते, अचानक बसने पेट घेतला आणि पुढे काय घडले? वाचा सविस्तर...

Read Time: 2 min
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बर्निंग बसचा थरार, बसमध्ये होते 36 प्रवासी; पुढे काय घडले?
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बसला भीषण आग

Mumbai Pune Express Highway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर शनिवारी (27 एप्रिल) सकाळी बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. हायवेवर एका खासगी बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. मावळ तालुक्याजवळ असलेल्या आढेगाव परिसरात ही घटना घडली आहे. या बसमधून एकूण 36 जण प्रवास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, खासगी कंपनीची ही बस मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवास करत होती. वडगाव पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या आढेगावात बस पोहोचताच बसचा टायर फुटला आणि शॉर्टसर्किट झाले. शॉर्टसर्किटमुळेच बसला भीषण आग लागल्याचे म्हटले जात आहे. गाडीने अचानक पेट घेताच सर्व प्रवासी तातडीने खाली उतरले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नाही. पण या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

बसला आग लागल्याची माहिती मिळताच आय.आर.बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स व वडगाव-मावळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आग नियंत्रणात आणण्याचे काम केले. दरम्यान या घटनेमुळे खासगी बसच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. 

(नक्की वाचा: कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! गर्दी टाळण्यासाठी उन्हाळ्यात विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय)

दिल्लीमध्ये दुमजली घराला लागली आग

देशाची राजधानी नवी दिल्लीच्या (New Delhi) रोहिणी परिसरामध्येही शनिवारी सकाळी दुमजली घराला आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या होत्या. अथक प्रयत्नांनतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले.

(नक्की वाचा: अति घाई संकटात नेई! अमेरिकेत गुजरातच्या 3 महिलांचा मृत्यू, हवेत 20 फुट उंच उडाली कार)

अग्निशमन दलाच्या जवानांनी घरामध्ये अडकलेल्या दोन जणांची सुखरूप सुटका देखील केली. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील रोहिणी परिसरामध्ये सेक्टर 14 मधील मिलनसार अपार्टमेंटमध्ये शनिवार (27 एप्रिल) सकाळी दुमजली घरामध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination