Wada Nagar Panchayat Results : नगरपालिका निकालाच्या मिरवणुकीदरम्यान दोन ठिकाणी धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. जेजुरीत मिरवणुकीदरम्यान भंडाऱ्याला आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर पालघरच्या वाडा नगरपंचायत निकालानंतर भाजपच्या मिरवणुकीदरम्यान दोन महिलांना मारहाण करण्यात आल्याचं ससमोप आलं आहे.
सीएनजी गाडीसमोर फटाके फोडल्याने वाद....
पालघरच्या वाडा नगरपंचायत निवडणूक निकालानंतर भाजपच्या विजयी नगरसेवकाच्या मिरवणुकीदरम्यान घडलेल्या प्रकारामुळे वाडा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजप नगरसेवकाच्या मिरवणुकीत सीएनजी गाडीसमोर फटाके वाजविण्यास विरोध केल्याने दोन महिलांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. जखमी महिलांवर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या नातेवाईकांनी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी जखमी महिलांनी सरकारकडे केली आहे.
मारहाणीत जखमी महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप विजयी नगरसेवक तेजेश पाटील यांच्या मिरवणुकीदरम्यान घरासमोर उभ्या असलेल्या सीएनजी गाडीवर फटाक्यांची माळ फोडली जात होती. यास विरोध केल्यावर शिवीगाळ करत महिलांना मारहाण करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.