Kolhapur News: देशसेवा करण्याचं स्वप्न भंगलं; सैन्य भरतीवरून परतणाऱ्या 2 तरुणांचा अपघातात मृत्यू

Kolhapur Accident News: अपघातानंतर ट्रकचालक पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र नागरिकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. शाहूवाडी आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. 

जाहिरात
Read Time: 2 mins

विशाल पुजारी, कोल्हापूर

Kolhapur Accident News: सैन्य भरती प्रक्रिया पूर्ण करून निघालेल्या दोन तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर हा अपघात घडला. शाहूवाडी तालुक्याच्या अंबार्डे या गावातील दोघेही तरुण होता. तरुणांच्या मृत्यू गावात शोककळा पसरली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर खुटाळवाडी गावानजीक ऊसाच्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. या घटनेत 19 वर्षाचा पारस आनंदा परीट आणि 20 वर्षाचा सुरज ज्ञानदेव उंड्रीकर या दोघांचा मृत्यू झाला. 

(नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajinagar: लग्नातील एक घोषणा अन् PMO तील अधिकारी थेट जेलमध्ये , DCP ची स्मार्ट कामगिरी चर्चेत)

शाहूवाडी तालुक्याच्या अंबार्डे या गावातील या दोन्ही तरुणांचा अपघातात जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र नागरिकांनी त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. शाहूवाडी आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. 

(नक्की वाचा-  Palghar Politics: भाजपची दुटप्पी भूमिका! साधू हत्याकांडात केले गंभीर आरोप, त्याच्याच हाती दिले कमळ)

सैन्य भरती प्रक्रिया पूर्ण गावी परत निघालेल्या या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच कुटुंबावर दुखांचा डोंगळ कोसळला. दोन्ही तरुणांचे मृतदेह मलकापूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.तर पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 
 

Advertisement
Topics mentioned in this article