जाहिरात

Palghar Politics: भाजपची दुटप्पी भूमिका! साधू हत्याकांडात केले गंभीर आरोप, त्याच्याच हाती दिले कमळ

 पालघर लोकसभेचे भाजपचे खासदार हेमंत सावरा आणि भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत चौधरी यांचा पक्षप्रवेश झाला.  

Palghar Politics: भाजपची दुटप्पी भूमिका! साधू हत्याकांडात केले गंभीर आरोप, त्याच्याच हाती दिले कमळ

मनोज सातवी, पालघर: महाविकास आघाडी सरकारच्या काळात 2020 मधील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात गंभीर आरोप असलेले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्थानिक नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी तब्बल 4000 पेक्षा जास्त समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने पालघरची राजकीय समीकरणे हादरली आहेत. या पक्षप्रवेशानंतर भाजपवर टिकेची झोड उठली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पालघरमध्ये भाजपने राष्ट्रवादी शरद पवार गटाला जोरदार धक्का दिला आहे.  राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी यांचा 4000 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.  पालघर लोकसभेचे भाजपचे खासदार हेमंत सावरा आणि भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत चौधरी यांचा पक्षप्रवेश झाला.  

Shocking news: BJP नेत्याच्या पत्नीचा गुढ मृत्यू, सासरच्यांचा गुपचूप अंत्यसंस्काराचा डाव, पण पुढे...

पक्षप्रवेश करताना काशिनाथ चौधरी यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. डहाणूच्या गडचिंचले गावात 16 एप्रिल 2020 रोजी,  दोन साधू आणि त्यांचा चालकाला जमावाने दगडफेक आणि जीवघेणा हल्ला करून ठार करण्यात आले होते.  या घटनेनंतर तब्बल 200 लोकांना अटक करण्यात आली होती. न्यायालयीन प्रक्रियेअंती, काही आरोपींना सशर्त जामीन मिळालेली आहे. 

पालघरच्या डहाणू तालुक्यात झालेले चार साधुंचे हत्याकांडा राज्यात प्रचंड गाजले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे प्रकरण घडल्याने भाजपने आंदोलनेही केली होती. या प्रकरणात काशिनाथ चौधरी हे साधू हत्या कांडातील मुख्य आरोपी असल्याचा आरोप त्यावेळी भाजप ने केला होता. शिवाय भाजपने याच घटनेवर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर तीव्र टीका केली होती. 

नक्की वाचा - Pune News: इंजिनिअर ते जिहादी दहशतवादी!, ATS च्या तपासात झुबेर हंगरगेकरची धक्कादायक कुंडली समोर

Listen to the latest songs, only on JioSaavn.com