शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुक उद्धव ठाकरे बुधवारी अचानक मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दादर येथील निवासस्थानी पोहोचले. ही घडामोड अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का देणारी होती. मराठीच्या मुद्दावरून दोन्ही भाऊ एकत्र एका व्यासपीठावर आल्यानंतरची ही चौथी भेट आहे. यापूर्वी गणेशोत्सवादरम्यान उद्धव ठाकरे हे आपल्या कुटुंबासह राज ठाकरे यांच्या घरी दर्शनासाठी आले होते. त्यापूर्वी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसाला मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची नेमके कारण काय याबद्दलचे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.
नक्की वाचा: काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय? आंदोलनाला दोन प्रमुख नेत्यांचीच दांडी
दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित
उद्धव ठाकरे हे 10 सप्टेंबर रोजी म्हणजेच बुधवारी त्यांच्या राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थवर पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे नेते संजय राऊत आणि अनिल परबही उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या पक्षाचे बाळा नांदगांवकर आणि संदीप देशपांडे हे या भेटीच्यावेळी उपस्थित होते. सवा बाराच्या सुमारास उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यानंतर बराच वेळ या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली होती.
नक्की वाचा: माजी उपसरपंच मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; कुटुंबीयांचे गंभीर आरोप
भेटीचे कारण काय?
2 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. दरवर्षी दसऱ्याला शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे हेच निमंत्रण घेऊन राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. दसरा मेळावा दोन्ही पक्षांचा संयुक्त दसरा मेळावा साजरा व्हावा यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. कारण राज ठाकरे यांनी दसरा मेळाव्याऐवजी गुढी पाडव्याला पक्षाचा मेळावा आयोजित करण्यास सुरूवात केली होती. यंदाच्या दसरा मेळाव्यामध्ये दोन्ही पक्षांची जाहीरपणे युती घोषित केली जाईल अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दृष्टीने बोलणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.