उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातून आज प्रचाराचा नारळ फोडला आहे. उद्धव ठाकरे यांची पहिली सभा आज आदमापुरात पार पडली. यावेळी कोल्हापुरातील महाविकास आघाडीचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते. सोमवारी कोल्हापुरात झालेल्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर सतेज पाटील आणि शाहू महाराज एकत्र व्यासपीठावर दिसले. मात्र उद्धव ठाकरे यांच्या या सभेत सतेज पाटलांची हवा दिसली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरे यांनी भाषणात सतेज पाटील यांचा उल्लेख करताच कार्यकर्त्यांना जोरात घोषणाबाजी सुरु केली. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांना पुढे बोलावून घेतले. शाहू महाराजांना पण घेऊन या, उमेदवारांना पण घेऊन या असं उद्धव ठाकरेंना सतेज पाटलांना म्हटलं. यावेळी उपस्थितांनी सतेज पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार आवाज केला.
उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटलांचं कौतुक केलं. "सतेज पाटील यांचं नाव घेतल्यावर उत्साह पाहिलात. सतेज पाटील सोबत आहेत याचा मला आनंद आहे. मी इथल्या विजयाजी जबाबदारी आता सतेजवरच टाकतोय. आता ही जबाबदारी घ्यायलाच पाहिजे. शाहू महाराज देखील सोबत आहेत, त्यांचे आशीर्वाद सोबत आहेत. असं वातावरण असलं की मन भरून येतं. तुमचा उत्साह, जोश असाच पाहिजे", असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
(नक्की वाचा- "प्रवक्ते पद गेलं तरी चालेल...", कराळे मास्तरांनी घेतली आपल्याच पक्षाची 'शाळा')
ठाकरेंच्या 3 मोठ्या घोषणा
उद्धव ठाकरे यांनी आपल्या पहिल्या जाहीर सभेत तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत. मतदारांनी मविआचं सरकार आणण्यावे असे आवाहन ही त्यांनी केले. युतीचं सरकार असताना मनोहर जोशी हे मुख्यमत्री होतो. त्यावेळी सरकारने पाच जिवनावश्यक वस्तूंचे दर हे स्थिर ठेवले होते. मविआचं सरकार आल्यास पाच जिवनावश्यक वस्तूंची दर स्थिर ठेवले जातील अशी घोषणा यावेळी ठाकरे यांनी केली. त्यानंतर मुलींना शिक्षण हे मोफत आहे. त्याच प्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण दिले जाईल अशी दुसरी घोषणा त्यांनी केली. त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदीर प्रत्येक जिल्ह्यात उभी करणार ही तिसरी घोषणा उद्धव ठाकरे यांनी आपल्या पहिल्या सभेत केली.
(नक्की वाचा- 'खोडा घालणाऱ्यांना कोल्हापुरी जोडा दाखवा..', साताऱ्यातील सभेत CM शिंदे कडाडले; ठाकरेंवर हल्लाबोल)
गद्दाराला या निवडणुकीत गाडा
राधानगरी विधानसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाने के. पी. पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांसमोर शिंदे शिवसेनेनं विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांना उमेदवारी दिली आहे. यावेळी ठाकरे यांनी आबिटकर यांच्यावर हल्लाबोल केला. यांना काही न मागता सर्व काही दिलं. मोठं केलं. त्यांना उमेदवारी देणं ही माझी चुक होती. त्यांनी गद्दारी केली. पाठीत वार केला. त्यांना या निवडणुकीत गाडा. पुढच्या काळात ते राजकारणातच दिसायला नको असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.