Vikhroli Slab Collapsed : मुंबईमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा काही भाग कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (10 जून) ही माहिती दिली. महापालिकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विक्रोळी परिसरातील कैलास बिझनेस पार्क येथे रविवारी (9 जून) रात्री 11.10 वाजता हा अपघात झाला. रविवारी रात्री मुंबईतील काही परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत होता.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यावेळेसही निर्माणाधीन इमारतीचा धोकादायक भाग लोंबकळत असल्याचे दिसले, तर बाल्कनीचा काही भाग कोसळला होता. हानी टाळण्यासाठी अग्निशमन दलाने इमारतीचा धोकादायक भाग काढला. या दुर्घटनेमध्ये दोन जण जखमी झाले होते.
(नक्की वाचा: कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, प्रशासनाकडून करण्यात आलंय हे आवाहन)
अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी स्थानिकांनी या दोघांनाही राजवाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले; अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृतांमध्ये एक 38 वर्षीय व्यक्ती आणि 10 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.
(नक्की वाचा: Mumbai Coastal Road : मुंबई कोस्टल रोडचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी आज होणार खुला)
यापूर्वी 5 जून रोजी माहिम परिसरातही एक इमारत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर आणखी एक जण जखमी झाला होता.
(नक्की वाचा: Terrorist attack on devotees : जम्मू-कश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला, 10 जणांचा मृत्यू)