Marathwada Rain News : मराठवाड्याला सोमवारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. काही ठिकाणी जीवितहानीही झाल्याची माहिती आहे.
परभणी
परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. या अवकाळी वादळ वाऱ्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. जिंतूर तालुक्यातील कोरवाडी गाव परिसरात समाधान कोंडाळ या शेतकऱ्याच्या शेतातील झोपड्यावर वीज पडून झोपडी जळाली आहे. त्यामध्ये बांधून ठेवलेली गाय आणि वासरू वीज पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याशिवाय शेती उपयुक्त ठेवलेले अवजारे हे सुद्धा जळून खाक झाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हिंगोली
हिंगोली जिल्ह्यात काही भागांमध्ये वादळी वारे आणि पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे काही भागात केळीच्या बागांचे आणि आंब्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी लग्न समारंभ आयोजित करण्यात आले होते. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे लग्न मंडप उडून गेल्याच्या काही घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे लग्नामध्ये आलेल्या वऱ्हाडी मंडळीची मोठी तारांबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी गारपिटीसह मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. या पावसानंतर अनेक ठिकाणी शेती आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. मौजे कोडापूर गट नंबर 89 तालुका गंगापूर येथील शेत वस्तीवर राहणारे अशोक नंदू म्हस्के (वय 22 वर्षे) या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्युमुखी झाले आहेत.
(नक्की वाचा - Rahul Gandhi meets Modi: पंतप्रधान कार्यालयात मोदी- राहुल गांधी यांची बैठक, चर्चा काय झाली?)
बीड
अंबेजोगाईतील मगरवाडी तालुक्यातील सचिन मधुकरराव मगर यांचा अवकाळी पावसात शेतात वीज पडून मृत्यू झाला आहे. वडवणी तालुक्यातील अभिमन्यू पांडुरंग नलभे यांचा देखील वीज पडून मृत्यू झाला आहे. केज तालुक्यातील चिंचोली माळी, हादगाव, डोका, सारुकवाडी या परिसरात गारासह अवकाळी पाऊस पडला आहे.
लातूर
लातूर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकासह फळबागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. परभणी जिल्ह्याच्याही काही भागांत मुसळधार पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यात रिसोड, वाशिम परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला. लासूर बाजार समितीत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीत आणलेला शेतकऱ्यांनाचा मालही पावसात भिजला आहे.
(नक्की वाचा- Pahalgam attack: पाकिस्तानची टरकली! 'फतह' या क्षेपणास्त्राची केली चाचणी, 3 दिवसात 2 चाचण्या)
जालना
जालन्यातील बदनापूर तालुक्यातील कंडारी गावात गरपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याने फळबागांचे ही मोठं नुकसान झालं आहे. तर अनेक ठिकाणी अचानक झालेल्या या गरपीट आणि पाऊसामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली.