Unseasonal Rain: मराठवाड्यात अवकाळीचा धुमाकूळ, 8636 हेक्टरवरील पिक भुईसपाट, 25 जणांचा मृत्यू

Marathwada Rain News : मे महिन्यातील या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील 8 हजार 636 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Marathwada Rain : मराठवाड्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.  25 नागरिकांचा यात मृत्यू झाला आहे. या अवकाळी पावसामुळे 439 गाव बाधित झाली आहे. तर 465 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मे महिन्यातील या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील 8 हजार 636 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर याच आठ जिल्ह्यातील एकूण 13 हजार शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा झाला आहे. दरम्यान मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झालं पाहूया. 

मे महिन्यातील नुकसान

छत्रपती संभाजीनगर
बाधित गावाची संख्या : 100
जखमी व्यक्ती संख्या : 05
मयत व्यक्तींची संख्या : 05
जनावर मृत्यू : 63
पडझड झालेल्या घरांची संख्या : 181
बाधित शेतकऱ्यांची संख्या : 1246
शेत पीक नुकसान : 616.6 हेक्टर

जालना
बाधित गावाची संख्या : 4
जखमी व्यक्ती संख्या : 00
मयत व्यक्तींची संख्या : 00
जनावर मृत्यू : 16
पडझड झालेल्या घरांची संख्या : 05
बाधित शेतकऱ्यांची संख्या : 2646
शेत पीक नुकसान : 1926.56 हेक्टर

Advertisement

(नक्की वाचा-  Farmer News : राज्य सरकारचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धक्का; भरपाईसाठी जमिनीची कमाल मर्यादा घटवली)

परभणी
बाधित गावाची संख्या : 05
जखमी व्यक्ती संख्या : 01
मयत व्यक्तींची संख्या : 01
जनावर मृत्यू : 27
पडझड झालेल्या घरांची संख्या : 26
बाधित शेतकऱ्यांची संख्या : 718
शेत पीक नुकसान : 443.94 हेक्टर

हिंगोली 
बाधित गावाची संख्या : 43
जखमी व्यक्ती संख्या  : 06
मयत व्यक्तींची संख्या : 02
जनावर मृत्यू : 76
पडझड झालेल्या घरांची संख्या : 00
बाधित शेतकऱ्यांची संख्या : 155
शेत पीक नुकसान : 34.8 हेक्टर

Advertisement

नांदेड 
बाधित गावाची संख्या : 77
जखमी व्यक्ती संख्या : 04
मयत व्यक्तींची संख्या : 05
जनावर मृत्यू : 71
पडझड झालेल्या घरांची संख्या : 10
बाधित शेतकऱ्यांची संख्या : 456
शेत पीक नुकसान : 309.25 हेक्टर

बीड
बाधित गावाची संख्या : 80
जखमी व्यक्ती संख्या : 04
मयत व्यक्तींची संख्या : 05
जनावर मृत्यू : 80
पडझड झालेल्या घरांची संख्या : 87
बाधित शेतकऱ्यांची संख्या : 6418
शेत पीक नुकसान : 3931.18 हेक्टर

Advertisement

(नक्की वाचा-  Akola Crime: कृषी अधिकाऱ्यांची मोठी कारवाई! लाखो रुपयांचे बोगस बियाणे जप्त)

लातूर
बाधित गावाची संख्या : 84
जखमी व्यक्ती संख्या : 06
मयत व्यक्तींची संख्या : 06
जनावर मृत्यू : 105
पडझड झालेल्या घरांची संख्या : 30
बाधित शेतकऱ्यांची संख्या :1308 हेक्टर
शेत पीक नुकसान : 1328.58 हेक्टर

धाराशिव
बाधित गावाची संख्या : 45
जखमी व्यक्ती संख्या : 03
मयत व्यक्तींची संख्या : 01
जनावर मृत्यू : 36
पडझड झालेल्या घरांची संख्या : 78
बाधित शेतकऱ्यांची संख्या : 60
शेत पीक नुकसान : 45.98 हेक्टर

Topics mentioned in this article