16 days ago

सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा आहे आणि त्यामुळे आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीवेळी दिला होता. विशेष म्हणजे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊ हे भाजप आणि महायुतीच्या जाहीरनाम्यात दुसऱ्या क्रमांकाचं आश्वासन होते. मात्र एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी करता येणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महायुतीमधील समन्वयावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.  

Apr 01, 2025 22:38 (IST)

जुने वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास नव्यासाठी 15 टक्के कर सवलत

स्वेच्छेने वाहन मोडीत (स्क्रॅप) काढणाऱ्या वाहनधारकांना पुन्हा त्याचप्रकारचे नवीन वाहन खरेदी करताना 15 टक्के कर सवलत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. नोंदणीकृत वाहन निष्कासन केंद्रावर (आरव्हीएसएफ) परिवहन प्रकारातील वाहनांना नोंदणीपासून 8 वर्षांच्या आत वाहन स्वेच्छेने मोडीत काढल्यास तसेच परिवहनेतर प्रकारातील वाहनांना नोंदणी पासून 15 वर्षांच्या आत स्वेच्छेने वाहन मोडीत काढल्यास 10 टक्क्यांची कर सवलत दिली जात होत होती.

Apr 01, 2025 22:35 (IST)

आयएएस अधिकाऱ्यांच्या नवीन ठिकाणी नियुक्त्या

नेहा भोसले - रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी 

भारत बास्टेवाड - रोजगार हमी योजना नागपुर 

राजेंद्र भारूड - विकास आयुक्त उद्योग 

लक्ष्मी नारायण मिश्रा - जाॅईन्ट एमडी एमएसआरडीसी 

निधी पांडे - व्यवस्थापक संचालक लघु उद्योग 

वैष्णवी बी - अतिरिक्त आयुक्त नागपूर मनपा 

भारत बास्टेवाड - आयुक्त रोजगार हमी योजना नागपूर

Apr 01, 2025 22:23 (IST)

वसई विरार करांवर पुन्हा पाणी कपातीचे संकट

वसई विरार महापालिका क्षेत्रातील MMRDA च्या योजनेचा पाणी पुरवठा पुन्हा पूर्ण पणे बंद झाला आहे. MMRDA च्या योजनेचा कवडसा पंपिंग स्टेशन येथील mseb चा  दुरुस्त केलेला ट्रान्सफॉर्मर 24 तासांत पुन्हा नादुरुस्त झाल्याने वसई विरारकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे. 

Apr 01, 2025 22:21 (IST)

सांगलीच्या तासगाव, खानापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

सांगली जिल्ह्यात आज खानापूर, तासगाव आणि वाळवा तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. खानापूर आणि तासगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीठाचा पाऊस झाला आहे. आज दिवसभर उन्हाचा चांगला कडाका बसत होता. मात्र सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. तर वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यात आज सायंकाळी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाच्या  सरी पडल्याने ग्रामीण भागातील जनतेला उकाड्यापासून दिलासा मिळाला.

Advertisement
Apr 01, 2025 22:15 (IST)

कल्याण डोंबिवली मनपा आयुक्तांची बदली

कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची बदली पालघर जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली आहे. त्यांना त्वरीत पदभार स्विकारण्याच आदेश ही देण्यात आला आहे. 

Apr 01, 2025 21:42 (IST)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली उद्या महत्त्वाची बैठक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलवली आहे.  शिवतीर्थ येथे सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मनसेचे नेते, सरचिटणीस, प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

या बैठकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यभरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांसाठी कामाचे स्वरूप जाहीर करणार आहेत.  मुंबईत काही दिवसांपूर्वी झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने विविध पदाधिकाऱ्यांसाठी केंद्रीय समिती जाहीर केली होती.

Advertisement
Apr 01, 2025 17:22 (IST)

Kolhapur Rain: कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस, नागरिकांना दिलासा

कोल्हापुरातल्या अनेक भागात मुसळधार पाऊस

कोल्हापूर शहरात सुद्धा ढगाळ वातावरण; जोरदार पावसाचा इशारा

मागील तासाभरापासून ढगाळ वातावरण

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

Apr 01, 2025 14:51 (IST)

Live Update : गुजरातमधील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 13 जणांचा मृत्यू

गुजरातमधील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 13 जणांचा मृत्यू

Advertisement
Apr 01, 2025 13:41 (IST)

Live Update : पुणे शहरात चार ठिकाणी आंबा महोत्सवाला सुरुवात

सध्या पुणे शहरात चार ठिकाणी आंबा महोत्सव सुरू आहे. यंदा जी आय टॅगिंग केलेला आंबा बाजारात आल्यामुळे ग्राहकांची फसवणूक ही रोखली जाणार आहे. पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये भरलेल्या आंबा महोत्सवात 60 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यात शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री होणार असल्याने याचा फायदा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.

Apr 01, 2025 13:16 (IST)

Live Update : उद्या 12 वाजता लोकसभेत वक्फ बिल सादर होणार

उद्या 12 वाजता लोकसभेत वक्फ बिल सादर होणार 

विरोधकांकडून वक्फ बोर्डावर 12 तास चर्चा करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र यावर आठ तास चर्चा करण्यात आली.  

Apr 01, 2025 12:22 (IST)

Live Update : निवळी-जयगड मार्गावर ट्रक-मोटरसायकलचा भीषण अपघात

निवळी-जयगड मार्गावर ट्रक-मोटरसायकलचा भीषण अपघात

अपघातात मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू

अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी पेटवला ट्रक

रत्नागिरी तालुक्यातील जयगड चाफे येथील प्रकार

ट्रकने मोटारसायकल स्वाराला चिरडत दिड किलोमीटर नेलं फरफटत

रस्त्यावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीविरोधात ग्रामस्थ आक्रमक

जयगड निवळी रस्त्यावरची अवजड वाहनांची वाहतूक ग्रामस्थांनी रोखून धरली

Apr 01, 2025 11:46 (IST)

Live Update : सरकारकडून कर्जमाफीबाबत स्पष्टीकरण येताच शेतकऱ्यांकडून कर्ज फेडण्यास सुरुवात..

कर्जमाफी होणार नसल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देताच नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कर्जफेड करण्यास सुरुवात केल्याचे बघायला मिळते आहे.  बँकेने वेळोवेळी सूचना करून देखील कर्जमाफी होईल या आशेने शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नव्हती मात्र यामुळे दुसरीकडे व्याजाची रक्कम देखील दिवसेंदिवस वाढत गेली. विशेष म्हणजे बँकेने आता आक्रमक पवित्र घेतला असून शेतकऱ्यांना थेट मालमत्ता जप्तीची नोटीसच निबंधक कार्यालयांमार्फत पाठवली जाते आहे. एकंदरीतच शेतकऱ्यांनी आता पैसे भरण्यास सुरुवात केल्याने आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मोठा दिलासा मिळत आहे. 

Apr 01, 2025 11:45 (IST)

Live Update : किरकोळ फी साठी शाळा प्रशासनाने रोखली परीक्षा...

एकीकडे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून अनेक नवीन योजना तयार करण्यात आल्या आहेत तर दुसरीकडे अनेक खाजगी शाळांमध्ये दरवर्षी फी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते आणि याच फी मुळे विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेवेळी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल येथे काही विद्यार्थ्यांच्या फी बाकी असल्यामुळे त्यांना ऐन परीक्षा वेळेस शाळा प्रशासनाने परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या पालकांचे पगार हे पुढील काही दिवसात होणार असल्याने फी भरली न गेल्याने पालकांमधून रोष व्यक्त होत आहे, ऐन परीक्षेच्या वेळी फी च्या कारणामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याने पालकांनी याबाबत रोष व्यक्त केला आहे... तसेच शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले की, ज्यावेळेस तुम्ही फी भराल त्यावेळेस तुमची परीक्षा घेण्यात येईल असा अजब फतवा शाळा प्रशासनाने काढल्यामुळे पालकांमधून रोष व्यक्त होत आहे...

Apr 01, 2025 10:57 (IST)

Live Update : अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या तीन महिन्यात महिला अत्याचाराच्या 100 गुन्ह्यांची नोंद

अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या तीन महिन्यात महिला अत्याचाराच्या 100 गुन्ह्यांची नोंद

जानेवारी ते 30 मार्च या कालावधीत 31 पोलीस ठाण्याची आकडेवारी 

बलात्काराचे 32, विनयभंगाच्या 68 गुन्ह्यांची नोंद 

धक्कादायक म्हणजे 32 बलात्काराच्या गुन्ह्यात सर्व अल्पवयीन मुली 

अमरावती जिल्ह्यात मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर..

Apr 01, 2025 09:32 (IST)

Live Update : कोल्हापूर ते बिहार मार्गावर साप्ताहिक विशेष रेल्वे

कोल्हापूर ते बिहारचं कटीहार या मार्गावर एक साप्ताहिक विशेष रेल्वे धावणार आहे. उन्हाळी सुट्टीनिमित्त मध्य रेल्वेने सहा मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला.  त्यापैकी एक हा मार्ग आहे. 6 ते 29 एप्रिल या कालावधीत या मार्गावर एकूण आठ फेऱ्या होणार आहेत. ही विशेष रेल्वे कोल्हापुरातून दर रविवारी आणि कटीहारमधून प्रत्येक मंगळवारी असणार आहे.

Apr 01, 2025 07:10 (IST)

Live Update : रुग्णाचे नातेवाईक असल्याचे भासवून वाहन चोरी करणाऱ्याला अटक

दुचाकी वाहन चोरीसाठी अभिनव शक्कल लढविणाऱ्या आरोपीला नागपूर येथील अजनी पोलिसांनी अटक केली आहे. अधिकतर वेळ शासकीय रुग्णालयात घालवून तिथे पार्क असलेल्या दुचाकी वाहनांना लक्ष्य करणारा सदर आरोपी आपण रुग्णाचे नातेवाईक असल्याचे सांगत असे. रुग्णाचा नातेवाईक असल्याचे सांगितल्याने त्याच्यावर कुणाचा संशय गेला नाही आणि त्याने तब्बल पाच दुचाकी वाहने रुग्णालयातून चोरल्याचे नंतर उघड झाले. त्यांचेकडून 2 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Apr 01, 2025 07:09 (IST)

Live Update : बीड मशीद स्फोट प्रकरणाचा एटीएसनंतर आता गुप्तचर यंत्रणांनी घेतला आढावा

बीड मशीद स्फोट प्रकरणाचा एटीएसनंतर आता गुप्तचर यंत्रणांनी घेतला आढावा

मशीद स्फोटनंतर राज्य आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणा अलर्ट

राज्य आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी घटनेचा अहवाल पाठवला 

बीड मशीद स्फोट प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता