बाबा सिद्दीकींच्या अंत्यदर्शनाला पोहोचली उर्वशी रौतेला, मात्र एक चूक पडली महागात; लोकांचा संताप!

बाबा सिद्दीकींच्या अंत्यदर्शनाला उर्वशी रौतेलादेखील आली होती. मात्र तिच्यावर लोकांनी संताप व्यक्त केला. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) आता आपल्यात नाहीत. त्यांची 12 ऑक्टोबर रोजी शूटर्सनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यांच्यावर 13 ऑक्टोबर रोजी अंत्यसंस्कार झाले. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी बाबा सिद्दीकींना शेवटचा सलाम दिला. यावेळी सलमान खानसह दिग्गज कलाकार उपस्थित होते. सर्वांच्या चेहऱ्यावर दु:ख दिसत होतं. यावेळी उर्वशी रौतेलादेखील आली होती. मात्र तिच्यावर लोकांनी संताप व्यक्त केला. 

बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui death) बॉलिवूडचे नव्हते. ते राष्ट्रवादीचे नेता आणि माजी आमदार होते. मात्र ते दरवर्षी ईदीच्या दिवशी इफ्तार पार्टी देत होते. त्या इफ्तार पार्टीत राजकीय व्यक्तींशिवाय बॉलिवूड आणि टीव्ही क्षेत्रातील कलाकार आवर्जुन उपस्थित होते. बाबा सिद्दीकी सर्वजणांची पर्सनली भेट घेत आणि त्यांच्यासोबत फोटोही काढत. 

नक्की वाचा - बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी मोठी अपडेट; पुण्यातून एकाला अटक, अखेर मास्टरमाइंडची ओळख पटली

बाबा सिद्दीकींच्या अंत्यदर्शनाला कोण कोण पोहोचलं?
बाबा सिद्दीकींच्या हत्येने अख्खं मुंबई ढवळून निघालं. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नातेवाईकांशिवाय बॉलिवूडमधील सेलिब्रिटीज उपस्थित होते. जन्नत जुबैर, रश्मी देसाई, सना खान, शहनाज गिल, सलमान खान, एमसी स्टॅन, मन्नारा चोप्रा, सोहेल खान, अर्पिता खान, शूरा खान, जॉर्जिया एन्ड्रिंयानी, युलिया वंतूर, अदा खानसह अन्य सेलिब्रिटीजच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. बाबा सिद्दीकींच्या मृत्यूचा तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला धक्का बसला होता. 

उर्वशी रौतेलाही बाबा सिद्दीकींच्या अंत्यदर्शनाला पोहोचली...
उर्वशी रौतेलादेखील बाबा सिद्दीकींच्या अंत्यदर्शनाला आली होती. तिचा व्हिडिओ समोर आला आहे. तिने पांढऱ्या रंगाचा पोशाख घातला आहे. हातात रुमाल घेऊन ते डोळ्यातील अश्रू पुसताना दिसत आहे. मात्र लोकांनी तिच्या मेकअपवर संताप व्यक्त केला. या व्हिडिओमध्ये उर्वशी रौतेला मेकअप करून बाबा सिद्दीकींच्या अंत्यदर्शनाला पोहोचली होती. यानंतर तिला ट्रोल केलं जात आहे. 

Advertisement

उर्वशी रौतेलाचा मेकअप पाहून लोकांचा संताप...
उर्वशी रौतेलाचा व्हिडिओ पाहून एका युजरने प्रश्न विचारला की, कोणीही एखाद्याच्या अंत्यदर्शनाला जाताना इतका मेकअप करू शकतं. एकाने लिहिलं आहे की, जान जाऐ पर मेकअप न जाए... या व्हिडिओवर चाहत्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहे.