जाहिरात

बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी मोठी अपडेट; पुण्यातून एकाला अटक, अखेर मास्टरमाइंडची ओळख पटली

बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी मोठी अपडेट; पुण्यातून एकाला अटक, अखेर मास्टरमाइंडची ओळख पटली
मुंबई:

बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांना सहा आरोपींची ओळख पटली आहे. सहा आरोपींपैकी तीन जण अटकेत असून तिघांचा शोध सुरू आहे. पोलिसांना फरार आरोपींचे धागेदोरे सापडले आहे. चौथा आरोपी झिशान अख्तर हा या संपूर्ण प्लॅनचा मास्टर माईंड असल्याचा संशय पोलिसांना आहे. तिसरा आरोपी शिवकुमारचा शोध राज्याबाहेरचे पोलीस करतायत. मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत त्याचा शोध सुरू आहे. शिवकुमारचं शेवटचं लोकेशन हे पनवेल असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळतेय. 

दरम्यान या हत्या प्रकरणी गुरमेल, धर्मराज कश्यप या दोघांना घटनास्थळावरुन अटक करण्यात आली. त्यातल्या धर्मराज अल्पवयीन असल्याचा दावा आरोपींच्या वकिलांनी केला होता. मात्र वैद्यकीय चाचण्यांमध्ये धर्मराज अल्पवयीन नसल्याचं स्पष्ट झालंय. शुभम लोणकर यानं फेसबुक पोस्ट लिहित हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगनं स्वीकारल्याचं सांगितलं. पोलीस त्याच्या फेसबुक पोस्टची चौकशी करत आहेत. फरार आरोपी शुभम लोणकर याचा भाऊ प्रवीण लोणकर याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. प्रवीण लोणकरने कर्वेनगर वारजे भागात रूम भाड्याने देण्यासाठी केली होती असा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणातल्या तीन आरोपींची चौकशी सुरू तर तिघांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. 

धर्मराज कश्यप हा अल्पवयीन नाही..
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी धर्मराज कश्यप हा अल्पवयीन नसल्याचं स्पष्ट झालंय. कोर्टाने यासंदर्भात आदेश जारी केल्यानंतर आरोपीच्या वयाची पु्ष्टी करण्यासाठी ओसिफिकेशन चाचणी करण्यात आली. ओसिफिकेशन चाचणनंतर आरोपी धर्मराज कश्यप हा अल्पवयीन नसल्याचं स्पष्ट झालंय. काल कोर्टात आरोपींना हजर केल्यानंतर धर्मराज या आरोपीनं स्वतःचं वय 17 सांगितलं. अल्पवयीन आरोपी म्हणून वागणूक मिळावी यासाठी वय १७ असल्याचं सांगण्यात आलं. आरोपीच्या वकिलानेही कोर्टात आरोपी अल्पवयीन असल्याचा दावा केला होता.

पु्ण्यातून प्रवीणला अटक...
बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी शुभम लोणकरसह त्याचा भाऊ प्रवीण लोणकरला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. दोन्ही शुटर्सना प्रवीणने नेमल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी चौथ्या आरोपीची ओळख पटली असून मोहम्मद झिशान अख्तर नाव असल्याचं उघड झालं आहे. 

कोण आहे मोहम्मद झिशान अख्तर?
मोहम्मद झिशान अख्तर हाच या कटाचा मास्टरमाईंड असल्याचा पोलिसांना संशय आहे. मोहम्मद हा पंजाबच्या जालंधरचा राहणारा असून पतियाला जेलमध्ये कैदेत होता. झिशानच्याविरोधात सात गुन्हे दाखल असून पतियाला जेलमध्ये असतानाच तो लॉरेन्स बिश्नोई गँगच्या संपर्कात आला. झिशान अख्तर हा 7 जूनला जेलच्या बाहेर आला होता. त्यानंतर तो हरियाणाचा गुरमेलला भेटला. झिशानने शिवकुमार, धर्मराज आणि गुरमेलसाठी कुर्ल्यात राहायची व्यवस्था केली. सिद्दीकींच्या हत्येवेळी झिशान मुंबईतच होता हे उघड झालं आहे. झिशानचं मोबाईल लोकेशन हे हत्येदरम्यान मुंबईत असल्याचं समोर आलं आहे. 

घटनास्थळावरुन कुणाला अटक केली?
धर्मराज कश्यप
गुरमेल सिंह

घटनास्थळावरुन पळालेला तिसरा शुटर
शिवकुमार गौतम

बिश्नोई गँगची पोस्ट कुणी केली?
शुभम लोणकर

पुण्यातून कुणाला अटक?
प्रवीण लोणकर

हत्येचं अकोला कनेक्शन काय? दोन्ही भाऊ अकोल्याचे
प्रवीण लोणकर
शुभम लोणकर

किती आरोपी फरार?
मोहम्मद झिशान अख्तर
शुभम लोणकर
शिवकुमार गौतम

पुण्यातून कुणाला अटक?
प्रवीण लोणकर

हत्येचं अकोला कनेक्शन काय? दोन्ही भाऊ अकोल्याचे
प्रवीण लोणकर
शुभम लोणकर

किती आरोपी फरार?
मोहम्मद झिशान अख्तर
शुभम लोणकर
शिवकुमार गौतम


 

Previous Article
बिश्नोई गँगचा सूत्रधार कोण? सातासमुद्रापार बसून कशी चालवली जाते गँग?
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी मोठी अपडेट; पुण्यातून एकाला अटक, अखेर मास्टरमाइंडची ओळख पटली
Baba Siddique murder case mumbai police investing angels
Next Article
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांची हत्या का झाली? पोलीस तपास कोणत्या दिशेने?