
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी आणि वैष्णवीच्या कुटुंबीयांना पिस्तुल दाखवून धमकवणारा निलेश चव्हाण याच्या अडचणीत वाढ झाली आहे. तो लुक आऊट नोटीस देऊनही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची सहा पथके कार्यरत आहेत. मात्र आता निलेश चव्हाण याला स्टँडिग नोटीस जारी करून त्याची मालमत्ता जप्तीची प्रक्रिया बावधन पोलीस करणार असल्याची माहिती आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
20 मे रोजी वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी तिच्या 9 महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी कर्वेनगर येथील निलेश चव्हाणच्या घरी गेले होते. यावेळी त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून कस्पटे कुटुंबीयांना धमकावले. या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 351(3) आणि शस्त्र कायदा कलम 30 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यापूर्वी 17 मे रोजी त्याच्यावर बावधन पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले गेले आहेत.
नक्की वाचा - Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या आईवडिलांनी लेकीच्या लग्नात किती खर्च केला? आकडा पाहून डोळे होतील पांढरे
निलेश चव्हाणच्या मागावर पुणे पोलिसांचे 3 आणि आणि पिंपरी चिंचवड पोलिसांचे 3 पथकं आहेत, या शिवाय आरोपी चव्हाण हवाई मार्गे पळून जाऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड पोलिसांनी चव्हाण विरोधात लुक आऊट नोटीस देखील जारी केलीय आहे. मात्र गेल्या 7 दिवसांपासून निलेश चव्हाण पोलिसांना गुंगारा देत आहे. धक्कादायक बाब म्हणजे निलेश चव्हाण हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याचं सर्व रेकॉर्ड पुणे पोलिसांना माहीत असतांना आणि त्याच्यावर स्त्री अत्याचारासारखे गुन्हे दाखल असताना देखील पुणे पोलिसांनी त्याला बंदुकीचा परवाना दिला होता. त्यामुळे नीलेश चव्हाणला नक्की कोण पाठीशी घालतय हा प्रश्न निर्माण झालाय, तर दुसरीकडे आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाण परराज्यात ही जाण्याची शक्यता वर्तवत त्याच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट जारी केलं आहे, जर तो आपली ओळख लपवून गुंगारा देत असेल तर त्याच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता ही जप्त केली जाऊ शकते अशी ही शक्यता वर्तवली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world