40 minutes ago

वैष्णवी हगवणेचा मृत्यू झाल्यापासून फरार असलेले तिचे सासरे आणि दीर पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. वैष्णवी हगवणेची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल आणि वैष्णवीला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यात येईल असा शब्द अजित पवारांकडून कस्पटे कुटुंबीयांना दिला आहे. त्यामुळे आज या प्रकरणाक काय अपडेट येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


 

May 24, 2025 16:21 (IST)

Live Update : IPS अधिकारी सुपेकरांवर अंजली दमानियांचा गंभीर आरोप

IPS अधिकारी जालिंदर सुपेकरांवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केला आहे. 500 कोटींच्या घोटाळ्यात सुपेकरांचे नाव होते, ते बदलण्यासाठी सुपेकर यांनी दबाव टाकला असा आरोप दमानिया यांनी केला. याबाबत त्यांनी एक ऑडिओ क्लिप देखील ऐकवली. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचं आश्वासन दिलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

May 24, 2025 13:12 (IST)

Live Update : मेजर संदीप गायकर अनंतात विलीन; शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

वीरमरण प्रात्त झालेले संदिप पांडुरंग गायकर यांच्या अंत्यविधीला हजारोंचा जनसमुदाय जमला होता. संदीप गायकर अमर रहे अमर रहेच्या घोषनांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. गायकर यांच्या आई सरूबाई गायकर व पत्नी दीपाली संदीप गायकर यांनी टाहो फोडला आहे. यावेळी उपस्थित सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते. संदीप गायकर हे अत्यंत शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक होते. गायकर यांना आपल्या कर्तव्य बजावत असताना त्यांनी प्राणांची आहुती देऊन देशसेवा केली. त्यांच्या पश्चात त्याचा दीड वर्षीय मुलगा रेयांश, पत्नी दिपाली, आई सरूबाई,वडील-पांडुरंग असे चौघांचे कुटुंब आहे.त्यांना दोन बहिनी देखील आहेत.त्यांच्या अत्यंवीधीनंतर संपूर्ण ब्राम्हणवाडा गाव,अकोले तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडाला आहे.

May 24, 2025 12:27 (IST)

Live Update : रोहिणी खडसे यांच्याकडून रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पदावर एक स्वतंत्र व्यक्ती नेमा असं त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे म्हणाल्या आहेत

May 24, 2025 12:10 (IST)

Live Update : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून अनाधिकृत वस्तींवर कारवाई

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून अनाधिकृत वस्तींवर कारवाई 

सात चालींसह होल्डिंग आणि बंगल्याच्या संरक्षण भिंतीवर केली कारवाई 

कारवाई करत असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांचा मोठा विरोध 

मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने अडथळे दूर करून कारवाई केली पूर्ण

पालिकेच्या अनधिकृत विभागाच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस प्रशासन आणिजेसीबी खोकलनच्या सहाय्याने केली कारवाई 

सहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली कारवाई

Advertisement
May 24, 2025 11:49 (IST)

Live Update : मान्सून केरळात दाखल, भारतीय हवामान विभागाची घोषणा

मान्सून केरळात दाखल, भारतीय हवामान विभागाची घोषणा

May 24, 2025 10:17 (IST)

Live Update : रत्नागिरी जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट

गेले चार दिवस जिल्ह्याला झोडपणाऱ्या मान्सूनपूर्व पावसाने रात्रीपासून विश्रांती घेतल्याचं चित्र आहे.. पण सकाळपासून पावसाची रिमझीम पुन्हा सुरू झाली आहे.. दरम्यान जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमूसळधार पाऊस पडेल अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात चार दिवस ४५ ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून समुद्र अतिखवळलेला राहणार आहे. मच्छीमार बांधवांनी मच्छीमारीसाठी समुद्रात जाऊ नये जे मच्छीमार गेले असतील त्यांनी तातडीने परतावं, असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आलं आहे.

Advertisement
May 24, 2025 08:54 (IST)

Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली थोड्याच वेळात नीती आयोगाची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची बैठक आज सकाळी १० वाजता भारत मंडपम येथे होणार आहे. या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. "विकसित भारतासाठी विकसित राज्य" हा या बैठकीचा विषय आहे. या बैठकीत २०४७ पर्यंत भारताला विकसित करण्यात राज्यांच्या भूमिकेवर भर दिला जाणार आहे. 

केंद्र आणि राज्य सरकारांमधील समन्वय चांगला राहावा यावरही बैठकीत चर्चा होणार आहे. केंद्र सरकार देशासमोरील विकास आव्हानांबद्दल राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना माहिती देईल. सोबतच भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी राज्ये कशी पायाभरणी करू शकतात हे देखील राज्यांना सांगितल जाईल. 

देशभरात उद्योजकता, कौशल्ये आणि शाश्वत रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या उपाययोजनांवर देखील चर्चा होण्याची शक्यता

May 24, 2025 08:47 (IST)

Live Update : सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये पावसाची रिपरिप सुरुच

सातारा  पावसाची अपडेट

सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये पावसाची रिपरिप सुरुच

गेल्या 24 तासातला पाऊस

कोयना धरण परिसरात 84 मिलीमिटर

ठोसेघर 74 मिलीमिटर

कास 64 मिलीमिटर

धोम धरण परिसर – 59 मिलीमिटर

तारळी धरण परिसरात 87 मिलीमिटर 

महाबळेश्वर 28 मिलीमिटर

Advertisement
May 24, 2025 08:22 (IST)

Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल, थोड्याच वेळात नीती आयोगाच्या बैठकीला रवाना होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल, थोड्याच वेळात नीती आयोगाच्या बैठकीला रवाना होणार 

दिवसभर चालणार नीती आयोगाची बैठक

May 24, 2025 07:31 (IST)

Live Update : कणकवली आचरा रस्ता वाहतुकीस बंद, मार्गावरील वरवडे पुलाचे काम अपूर्ण

कणकवली आचरा रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. या मार्गावरील वरवडे पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे. कणकवली ते आचरा आणि आचरा ते कणकवली येथे येण्यासाठी कलमठ कुंभारवाडी मार्गे जावे लागणार आहे. त्यासाठी वाहन चालकांना चार किलोमीटरचा वळसा घालून जावे लागणार आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी वरवडे येथील पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हे काम अपूर्ण स्थितीत राहिले आहे. गेले सहा महिने वरवडे येथील जुना पूल तोडून तेथे नवीन पुलाची उभारणी केली जात होती. त्यासाठी नदीपात्रातून रस्ता काढण्यात आला होता. गेले चार दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा रस्ता पाण्याखाली गेला आहे. तर वरवडे पूल अपूर्ण असल्याने येथील वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहे

May 24, 2025 07:28 (IST)

Live Update : अबुझमाडमधील ते दोन माओवादी अल्पवयीन नाही!

गडचिरोली जिल्ह्यातील अबुझमाडच्या अतिदुर्गम बिनागुंडा परिसरातून अटक करण्यात आलेल्या पाच माओवादी कार्यकर्त्यांपैकी दोन जणांनी स्वतःला अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. मात्र, २२ मे रोजी वैद्यकीय चाचणीच्या अहवालानुसार दोघेही प्रौढ असल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणाला आता महत्त्वपूर्ण वळण मिळाले आहे.

May 24, 2025 06:56 (IST)

Live Update : जळगाव भाजपा कार्यालयात निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत बैठक

जळगाव मध्ये भाजप कार्यालयात जिल्ह्याची निवडणूक निरीक्षक प्रदीप पेशकार यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत जळगाव जिल्हा पूर्व व पश्चिम तसेच जळगाव महानगर मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन आमदार सुरेश भोळे यांनी या बैठकीत केले.

May 24, 2025 06:31 (IST)

Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा 3 दिवस महाराष्ट्र दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा 3 दिवस महाराष्ट्र दौरा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व आहे. नागपूर, नांदेड आणि मुंबई येथील विविध कामांच्या उद्घाटनासाठी अमित शाह उपस्थित राहणार आहेत. २५ ते २७ हे तीन दिवस अमित शाह महाराष्ट्रात असतील.