Dog Attack: भयंकर! भटक्या कुत्र्याचा हैदोस, 35 जणांचे लचके तोडले; नागरिक भयभीत

वसईमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वसई परिसरात एका कुत्र्याने  तब्बल ३५ जणांचा चावा घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, वसई: शहरात तसेच मानवी वस्त्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती दहशत पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी, चिमुकल्यांवर, परिसरातील नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्यात. असाच धक्कादायक प्रकार वसईत घडला असून एका कुत्र्याने तब्बल 35 जणांना चावा घेतल्याचे समोर आलं आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वसईमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वसई परिसरात एका कुत्र्याने  तब्बल ३५ जणांचा चावा घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराने नागरिकांंचे घराबाहेर पडणे मुश्किल झाले असून भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यात महानगरपालिकेला अपयश येत आहे. याप्रकरणी प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वसईतल्या पार नाका, झेंडा बाजार या परिसरात नागरिक अक्षरशा जीव मुठीत घेऊन फिरत आहेत.  या कुत्र्याने तीन वर्षाच्या चिमुकलीसह 70 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत नागरिकांना चावा घेतला आहे. सर्व जखमींवर येथील डी एम पेटीट रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. शनिवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत या कुत्र्याने अक्षरशः परिसरात दहशत निर्माण केली होती.

त्यानंतर कुत्र्याला पकडण्यासाठी महानगरपालिकेचे पथक येऊन कुत्र्याचा शोध घेत होते मात्र कुत्रा सापडला नाही.  विशेष म्हणजे कुत्र्यांच्या निरबीजीकरणासाठी महापालिकेकडून कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे मात्र महापालिकेला भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण करण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

दरम्यान, या अगोदर वसईतल्या अर्नाळा गावामध्ये अशाच एका  पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 28 जणांना चावा घेतला होता. या घटनेवरुन नागरिकांनी संताप व्यक्त केला असून प्रशासनाने ताबडतोब याकडे लक्ष घालून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. 

(नक्की वाचा - Year Ender 2024 : देशाच्या 'या' लेकींनी रचला इतिहास, 2024 गाजवलं!)