- समाधान जाधव, नवी मुंबई
महाराष्ट्रामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्याची आवक कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
(नक्की वाचा: धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस, लोकांच्या घरात शिरले नाल्याचे पाणी)
याचा थेट परिणाम भाज्यांच्या किंमतीवर होत असून भाज्यांच्या दरामध्ये 30 ते 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आगामी काळात देखील भाज्यांची आवक कमी झाली तर भाज्यांचे दर अधिक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
(नक्की वाचा: पावसात मंदिराशेजारी मित्रासोबत गप्पा मारत उभा होता अन् आला मृत्यू; धक्कादायक प्रकार समोर)
वाढलेले दर | ||
वांगे प्रतिकिलो | 40 रुपये | 60 रुपये |
मेथी जुडी | 25 रुपये | 40 रुपये |
टोमॅटो प्रतिकिलो | 30 रुपये | 50 रुपये |
शिमला मिरची प्रतिकिलो | 30 रुपये | 60 रुपये |
दरवाढीमागे भाज्यांचे आवक कमी झाल्याचे कारण व्यापाऱ्यांकडून सांगितले जात असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला अधिक कात्री लागण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा: मान्सून आणि... ! महाराष्ट्रभरात पावसाची तुफान बॅटिंग; 'या' जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट)