यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. उमरखेड तालुक्यातील 17 रस्ते वाहतूकसाठी बंद करण्यात आली आहेत. यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणांचा जनजीवन विस्कळीत झालं आहे. उमरखेड तालुक्यातील 230 घरात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. बाभुळगाव तालुक्यातील बेंबळाचे सहा आणि इसापूर धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत, अशी माहिती नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
उमरखेड तालुक्यातील 230 घरामध्ये पुराचे पाणी शिरूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे पुसद तालुक्यातील अफरपुर धरण 100 टक्के भरले आहे. त्याचा सांडव्यातून सध्या 70 सेंटिमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पैनगंगा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उमरखेड तालुक्यातील नदीकाठावर असलेल्या गांचेगाव सावळेश्वर करंजी माणकेश्वर या गावांमध्ये पुराचे पाणी शिरून अनेक घरांचे नुकसान झाले. तर चिखली गावात पुराच्या प्रवाहात पाण्यात एक मोठा ट्रॅक्टर अगदी होडी सारखा वाहत गेला आहे.
बिटरगाव रस्त्यावरील आठरीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने बावीस गावांचा संपर्क तुटला आहे. बससेवा ही विस्कळीत झाली आहे. तालुका महागाव मोजे धर्मोहा येथे पुरामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. तर वाशिम जिल्ह्यात मागील दोन दिवस मुसळधार पाऊस झाला आहे. यात जिल्ह्यातील 14 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील पैनगंगा,अडाण,काटेपूर्णा आणि पूस या प्रमुख नाद्यांसह इतरही सर्व छोट्या नदी नाल्याला मोठा पूर आला होता.
त्यामुळं खरीप हंगामातील सोयाबीन, हळद,कपाशी, उडीद,मूग ही पीकं पुरात वाहून गेलीत तर काही ठिकाणी जमीनही पूर्णतः खरडून गेली आहे. त्यामुळं शतकऱ्याचं मोठं नुकसान झालं असून हातातोंडांशी आलेला घास हिरावला गेला आहे. तर अनेक गवात पाणी घुसल्याने संसार युक्त साहित्य खराब झालं आहे. 40 जनावर वाहून गेले तर 8 ते 10 जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करून भरीव मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. हवामान विभागाकडून पुढील काही तास येलो अलर्ट जारी करण्यात आला असून पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.