Buldhana heat stroke : सध्या राज्यभरात उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळत आहे. मुंबई-पुण्यासारख्या भागातही उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे राज्यभरात जिथं सर्वाधिक तापमान असतं अशा विदर्भात तर नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी बुलढाण्यातून एका मुलाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान या प्रकरणात वैद्यकीय अहवाल समोर आला आहे. या अहवालातून वेगळीत माहिती समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नक्की वाचा - मासिक पाळी सुरू असल्याने दलित विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बसवलं, Video समोर आल्यानंतर देशभरातून संताप
दरम्यान उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचा आवाहन डॉक्टर गिऱ्हे यांनी केलं आहे . शक्यतो उन्हाच्या वेळेस घराच्या बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावं, तसंच उष्माघाताची लक्षणे आढळल्यास तत्काळ शासकीय रुग्णालयात वैद्यकीय मदत घ्यावी असं आवाहन अकोला महानगर आरोग्य अधिकारी डॉक्टर डॉ. आशिष गिऱ्हे यांनी अकोलाकरांना केलं आहे.