
Akola News : अकोल्याच्या सम्राट वाईन शॉप येथे मद्यपी ग्राहकांची लूट होत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून गटारीनिमित्ताने वाईट शॉपमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. या गर्दीत वाईन शॉप मालक एमआरपीपेक्षा अधिक पैसे आकारत असल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
आयकॉनिक व्हिस्कीच्या बाटलीची मूळ किंमत 170 (जुनी किंमत) रुपयांनी विक्रीसाठी ठेवली असताना अकोल्यात मात्र सम्राट वाईनशॉप व्यवस्थापक हीच बाटली 190 रुपयांनी विकली जात आहे. त्यामुळे दारू पिणाऱ्यांची 20 ते 30 रुपयांनी आर्थिक फसवणूक केली जात आहे. दरम्यान वाईन शॉप दुकान व्यवस्थापकाला विचारणा केल्यानंतर त्याने, ही बाटली 230 रुपयांना विकली जात आहे. घ्यायची असेल तर घ्या.. असं म्हणत आयकॉनिक व्हिस्की दारू बाटली परत घेतली आणि दोनशे रुपयात दुसऱ्या ग्राहकाला विकली. 'तुला जे करायचं ते कर...' असं म्हणज दुकान माल अरेरावीची भाषा वापरत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. अकोला शहरासह जिल्हाभरात अशा अनेक वाईन शॉप दुकानांमध्ये ग्राहकांच्या फसवणुकीचा प्रकार घडत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन आणि पोलीस विभागाकडून यावर कारवाई व्हावी अशी मागणी अकोलेकरांकडून केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world