Political News : अजित पवारांचं टेन्शन वाढलं? इंदापुरात अजित पवार गटात फूट?

Indapur Politics : इंदापुरात विधानसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यापूर्वीच वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. महायुती फूट पडण्याची चर्चा सुरु असताना आता अजित पवार गटातंही फूट पडण्याची चर्चा सुरु झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

देवा राखुंडे, इंदापूर

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला होम ग्राऊंडवर मोठा धक्का बसला. बारामती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. मात्र लोकसभेतील पराभव विसरून अजित पवार गटाने विधानसभेची तयारी सुरु केली आहे. मात्र इंदापुरात अजित पवार गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.  

इंदापुरात विधानसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यापूर्वीच वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. महायुती फूट पडण्याची चर्चा सुरु असताना आता अजित पवार गटातंही फूट पडण्याची चर्चा सुरु झाली आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी विमानाच्या चिन्हाची बॅनरबाची केली होती. म्हणजे अपक्ष लढण्याची तयारी दाखवली. त्यानंतर आमदार दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकर्त्यांनी देखील आमचं ठरत नाही तर फिक्स असतं' अशी बॅनरबाजी केली. त्यानंतर शरद पवार गटाकडून देखील बॅनरबाजी करण्यात आली.

Indapur Political News

आता इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात फूट पडली की काय असा प्रश्न उपस्थित झाला. कारण इंदापुरात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांचेही भावी आमदार म्हणून बॅनर झळकले आहेत. यावर बॅनरवर "लक्ष नाही फिक्स आहे 2024 प्रदीप दादा गारटकर आमदार साहेब" असा मजकूर लिहिण्यात आला आहे. तसेच सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर असं देखील नमूद करण्यात आलं आहे.

इंदापूरची जागा राष्ट्रवादीचीच 

2019 साली हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडण्याचं कारणचं होतं ते म्हणजे इंदापूरची विधानसभेची जागा. 2019 ला भले आघाडी तुटली तरी बेहत्तर पण इंदापूरची जागा सोडणार नाही, अशी गर्जनाच अजित पवारांनी केली होती.आता हेच अजित पवार भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाल्याने इंदापूरच्या जागेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. पुन्हा इंदापूरच्या जागेवर अजित पवार अडून बसतील आणि सत्ताधारी आमदार म्हणून इंदापूरची जागा दत्तात्रय भरणे यांना सुटेल असे संकेत कार्यकर्त्यांना मिळू लागल्याने पाटील यांनी आतापासूनच अपक्ष म्हणून लढण्याची तयारी सुरु केल्याचं दिसून येतं.

Advertisement
Topics mentioned in this article