रेवती हिंगवे, प्रतिनिधी
पुण्यात (Pune Crime News) पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुण-तरुणींवर गावगुंडांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील तळजाई टेकडीवर काही तरुण-तरुणी पोलीस भरतीचा सराव करीत होते. यादरम्यान काही गावगुंडांनी त्यांना शिवीगाळ करीत हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेचे काही व्हिडिओही समोर आले आहे.
पुण्यातील तळजाई टेकडीवर पोलीस भरतीचा मैदानी सराव केला जात होता. परंतु आज सकाळी सराव करत असताना दहा ते बारा गावगुंड तिथे पोहोचले. त्यांनी मुलींकडे पाहून अश्लील कमेंट केल्या. त्यांना शिवीगाळही करण्यात आली. त्यानंतर काही मुलांना मारहाण करत तुमची लायकी नाही पोलीस होण्याची असं म्हणत मारहाण करण्यात आली. त्यानंतर दोघांमध्ये हातापायी झाल्याचं सांगितलं जात आहे.
नक्की वाचा - Pune Water Cut: पुणेकरांसाठी महत्त्वाचं! शहरातील 'या' भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद, वाचा सविस्तर
मागील काही दिवसांपासून ही मुलं पोलीस भरतीचा मैदानी सराव करणाऱ्या मुलींचा पाठलाग करीत होते. या मुलींकडे पाहून अश्लील कमेंट करीत होते. आज सकाळी या गावगुंडांनी मुलांना मारहाण केली. तर मुलींना शिवीगाळ करण्यात आली. यानंतर येथील मुला-मुलींनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी पोलीस भरतीचे शिक्षक व मुले- मुली सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले.