पिण्याच्या पाण्यातून गावकऱ्यांना विषबाधा, नांदेडच्या नेरली गावात नेमकं काय घडलं?

Nanded News : सकाळपासून देखील अनेकांना असाच त्रास झाला. त्यांची तपासणी करुन उपचार करण्यात आले. या संपूर्ण प्रकारानंतर गावात आरोग्य पथक तळ ठोकून आहे. आलेल्या रुग्णाची तपासणी करुन उपचार दिले जात आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins

योगेश लाटकर, नांदेड

नांदेड शहराजवळच्या नेरली या गावात 200 हून अधिक जणांना विषबाधा झाली आहे. पिण्याच्या पाण्यामुळे विषबाधा झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. गावातील सार्वजानिक टाकीतून संपूर्ण  गावाला पाणी पुरवठा केला जातो. याच टाकीतील पाणी पिल्याने विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्री काही जणांना उटल्या , जुलाब , चक्कर येणे असा त्रास होऊ लागला होता. त्यानंतर मात्र हा प्रकार वाढत गेला. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मोठया संख्येने रूग्ण वाढत असल्याने मिळेल त्या वाहनाने रुग्नांना शासकीय आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्रीतून 200 हून अधिक जणांना विषबाधा झाली आहे. आज सकाळपासून देखील अनेकांना असाच त्रास झाला. त्यांची तपासणी करुन उपचार करण्यात आले. या संपूर्ण प्रकारानंतर गावात आरोग्य पथक तळ ठोकून आहे. आलेल्या रुग्णाची तपासणी करुन उपचार दिले जात आहेत.

(नक्की वाचा-  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना; राज्यातील पहिली ट्रेन कोल्हापूरातून अयोध्येसाठी जाणार)

जास्त त्रास होत असेलल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले जात आहे. सार्वजानिक टाकीतील पाणी दूषित झाल्याने हा प्रकार घडल्याचं डॉक्टरांनी सांगितले. आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. सध्या पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून टाकीची सफाई सूरु केली जात आहे.

(नक्की वाचा- अजित पवार गटातील बड्या नेत्याच्या मतदारसंघावर भाजपचा दावा; 'नोटा'ला मतदान करण्याचा इशारा)

या प्रकरणात नेरली गावात जेव्हा एनडीटीव्हीने माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या गावात शासनाने पाच वर्षांपूर्वीच वॉटर फिल्टर योजना दिली असल्याची माहिती मिळाली. पण पाच वर्षापासून हे वॉटर फिल्टर धुळखात पडून आहे. याच नेरली गावात केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी योजना जलजीवन मिशनचा बोर्ड लावलेला दिसला 2022 सध्या या गावात जलजीवन योजना जलजीवन मिशन योजना मंजूर झाली आणि काम सुरू झालं असा हा बोर्ड दर्शवतो.

मात्र गावातील उपसरपंचांना याबाबत विचारलं असता त्यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे. 2022 साली जी योजना मंजूर झाली त्या योजनेचा बोर्ड नुकताच गावात बसवण्यात आला होता. या योजनेचे काहीही काम गावात झालं नसल्याचं खुद्द विद्यमान उपसरपंच  यांनी सांगितले.

Topics mentioned in this article