जाहिरात

Video: उंदरासारखे दिसणारे हरीण! दुर्मीळ प्रजातीचे हरीण मालवणच्या जंगलात, पाहा जबरदस्त Video

हा प्राणी रात्रीच्या वेळी सूर्यास्तानंतर बाहेर पडणारा प्राणी आहे. हा प्राणी कोकणात सह्याद्रीमध्ये आढळला जातो.

Video: उंदरासारखे दिसणारे हरीण! दुर्मीळ प्रजातीचे हरीण मालवणच्या जंगलात, पाहा जबरदस्त Video
सिंधुदुर्ग:

गुरुप्रसाद दळवी

हरणांच्या अंत्यत दुर्मीळ प्रजाती मधील पिसोरी हरीण कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मालवण मधील एका जंगलात मुक्त संचार करताना हे हरीण आढळून आले. निसर्ग अभ्यासक दर्शन वेंगुर्लेकर यांनी या हरणाच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत. पिसोरी हरीणाला स्थानिक भाषेत पीसय म्हणून ओळखले जाते. सध्या या हरीणाचे अस्तित्व शिकारी मुळे धोक्यात आले आहे. घनदाट जंगलात या हरीणाचे वास्तव्य असून अन्नाच्या शोधात रात्रीच्या वेळी हे हरीण बाहेर पडते.

हा प्राणी रात्रीच्या वेळी सूर्यास्तानंतर बाहेर पडणारा प्राणी आहे. हा प्राणी कोकणात सह्याद्रीमध्ये आढळला जातो. या प्राण्याचे वजन साधारणतः तीन ते चार किलो असते. या प्राण्याची उंची 30 सेंटीमीटर पर्यंत आहे. हा प्राणी भारतातला हरीण कुळातला सगळ्यात छोटा हरीण प्राणी आहे. यांच्या वाढत्या शिकारीमुळे या प्राण्याचे अस्तित्व कमी होत चाललेलं आहे. हे प्राणी एक ते दोन पिल्लांनाचजन्म देऊ शकतात.  यांची पिल्ले जन्म झाल्यानंतर लगेच चालायला लागतात.  शिकारींपासून लपण्यासाठी ते दरी कपाऱ्यांमध्ये राहतात. 

नक्की वाचा - Trending News: लंडनमध्ये ड्रीम जॉब! 40 लाखाचं पॅकेज, भन्नाट लाईफ स्टाईल, तरी ही नोकरीवर मारली लाथ,कारण...

या प्राण्याचे वैशिष्ट्य म्हणजे या प्राण्यापासून माणसाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. हा प्राणी लाजाळू प्रकारचा प्राणी आहे . हे प्राणी जंगलातील फळे झाडापाला खातात.  वाढत्या जंगलतोडीमुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे या प्राण्यांची संख्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. हा प्राणी लाजाळू असल्यामुळे मानवी वस्तीत येत नाही.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात डोंगर भागात या प्राण्यांची संख्या फार दुर्मिळ आहे. अशी माहिती युथ बिट  फॉर क्लायमेंट ग्रुपचे दर्शन वेंगुर्लेकर यांनी दिली. मात्र नुकतेच हे दुर्मीळ हरीण दिसून आले. त्यामुळे या जंगलाच त्याचे अस्तित्व असणार आहे. ते टीकून ठेवण्याची जबाबदारी सगळ्यांचीच आहे असं ही वेंगुर्लेकर म्हणाले.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com