Jalna News: मास्तर की कुंभकर्ण? विद्यार्थ्यांसमोर शिक्षक डाराडूर, Video viral

त्याचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी वाजत गाजत सत्कार करत पुष्पगुच्छ देऊन शाळेत स्वागत करण्यात आलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
जालना:

शाळा सुरू होऊन फक्त दोन दिवस झाले आहेत. जवळपास दिड महिन्याच्या सुट्टीनंतर विद्यार्थी शाळेत परतले आहे. शिक्षकांनीही सुट्टीची मजा घेवून शाळेत आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जोश आहे. नवे वर्ष, नवा वर्ग, नवा अभ्यास, नवे शिक्षक, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेचा ओढा असतो. एक वेगळे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये असते. पण जालना जिल्ह्यातील गाडेगव्हाण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत मात्र थोडं वेगळचं चित्र पाहायला मिळालं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जालन्यात जाफराबाद तालुक्यातील गाडेगव्हाण गावात जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेत विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. नव्या वर्षात नवं काही तरी शिकायला मिळेल म्हणून विद्यार्थी शाळेत दाखल झाले. पण कसलं काय? विद्यार्थी वर्गात बसले. पण शिकवणारे शिक्षक मात्र आडवे झाले. म्हणजे मास्तरांनी विद्यार्थ्यां समोरच डाराडूर होणं पसंत केलं. खुर्चीवर बसले. पाय समोरच्या टेबलवर ठेवले. आणि या मास्तर महाशयांनी दिली ताणून. विद्यार्थी मास्तरांच्या उठण्याची वाट पाहात होते. पण कसलं काय? मास्तर अगदी गाढ झोपत गेले होते. 

ट्रेंडिंग बातमी - DOOMSDAY FISH: एका माशामुळे जगाचं टेन्शन वाढलं, जगाची वाटचाल अंताकडे सुरू? काय आहे प्रकार?

दिड महिन्याची सुट्टी बहुतेक त्यांच्या अंगावर आली असावी. म्हणूनच की काय थोडी आणखी विश्रांती घ्यावी म्हणून हे मास्तर वर्गातच विद्यार्थ्यां समोर डाराडूर झोपले. या शिक्षक महाशयांचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पालकांनीच हा व्हिडीओ व्हायरल केल्याचं बोललं जात आहे. एकीकडे प्रशासनाकडून दोन दिवसापूर्वीच जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या वाढावी म्हणून प्रयत्न केले जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Iran Israel War: इराणनं भात्यातून काढलं खतरनाक अस्त्र, 'तो' एक बॉम्ब अन् इस्रायलचं काम तमाम?

त्याचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी वाजत गाजत सत्कार करत पुष्पगुच्छ देऊन शाळेत स्वागत करण्यात आल. पालकांना आपल्या पाल्यांना  जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याचं आव्हान केलं. पण दुसऱ्याच दिवशी शिक्षकांचा कुंभकरणाच्या निद्रा अवस्थेत पाहून पालकांनी त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. शिवाय असे शिक्षक असतील तर पटसंख्या कशी वाढणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा परिषद शाळांची जर अशी अवस्था असेल तर प्रवेश कसा घ्यायचा असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. 

Advertisement