मनोज सातवी, पालघर: राज्यात सध्या मराठी- हिंदी वाद चांगलाच वाढला आहे. मराठीचा अपमान करणाऱ्या परप्रांतियांना मनसे, शिवसैनिकांकडून धडा शिकवला जात आहे. काही दिवसांपूर्वीच विरारमध्ये भोजपुरी,हिंदीची सक्ती करणाऱ्या रिक्षाचालकाला शिवसेना (UBT) आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणात विरार पोलिसांनी शिवसेना उबाठा गट वआणि मनसेच्या 11 कार्यकर्त्यांसह इतर 5 ते 6 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सहा दिवसांपूर्वी विरार मध्ये एका रिक्षाचालकाने भावेश कन्होजीया या अमराठी तरुणाला मराठी बोलण्या विरोधात दमदाटी करून हिंदी आणि भोजपुरी बोलण्याची सक्ती केली होती. याविरोधात मनसे आणि शिवसेना उबाठा कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकाला शोधून चोप दिला होता, या प्रकरणात रिक्षा चालकाला मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी 11 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
Marathi Vs Hindi: "दुबई किंवा सिंगापूरला जा, तिथे भाषा शिकण्याची गरज नाही" केडियानंतर आणखी एक व्यावसायिक बरळला
मराठी भाषा व तिची अस्मिता टिकवण्यासाठी आम्ही अंगावर गुन्हे घेतले आहेत. भविष्यात वसई विरार मध्ये अशी परिस्थिती झाल्यास आम्ही पुन्हा एकत्र येऊन त्यांना सडेतोड उत्तर देऊ, असा इशारा यावेळी मनसे , शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. मराठी भाषेवरून सुरू केलेला वादात माझी मराठी बांधवांनी पाठ राखली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे , अशी कृतज्ञ भावना भावेश कन्होजिया या तरुणाने व्यक्त केली आहे.
काय घडलं होतं?
गेल्या आठवड्यात भावेश पडोलीया या दुचाकीस्वार तरुणाने रिक्षा चालकाने चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केल्याचा जाब मराठीतून विचारल्याने रिक्षाचालकाने त्याला हिंदीमध्ये बोलण्याची केली सक्ती करत त्याला आणि त्याच्या बहिणीला मारहाण देखील केली होती. मुळचा उत्तर प्रदेशमधील रहिवासी भावेश पडोलीया हा मराठीत बोलत असताना मुजोर रिक्षाचालक राजू पटवा याने त्याला आणि त्याच्या बहिणीला, शिवीगाळ करून धक्काबुक्की आणि मारहाण करत हिंदी बोलण्याची सक्ती केली होती. ज्यावरुन हा वाद वाढला होता.