
दिवाकर माने, प्रतिनिधी
Parbhani News : परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे या गावामध्ये एका शेतातून वाफ येत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून या शेतातील जमिनीतून वाफ येत आहे. या वाफ येण्याचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र ग्रामस्थांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. (Smoke from the farmland in Purna taluka)
मागील तीन ते चार दिवसापासून अचानक वाफ येत असल्याचं आढळून येत आहे. ग्रामस्थांनी शेताबाहेर मोठी गर्दी केली आहे. नेमकी ही वाफ येते कुठून याचा शोध ग्रामस्थांनी घेतला, परंतु याचा शोध लागत नसल्याने आता भीतीचे वातावरण या परिसरात पसरलं आहे. जमिनीखाली ज्वालामुखी तर नाही ना? भूकंप होण्याची शक्यता आहे का? असे अनेक प्रश्न गावकऱ्यांना पडत आहेत.
नक्की वाचा - Bullet Train: बुलेट ट्रेनमुळे पालघरकरांची डोकेदुखी वाढली; भूकंपासारखी स्थिती, घरांना तडे
दरम्यान उच्च अधिकाऱ्यांनी तत्काळ या भागाची चाचणी करावी आणि ही वाफ येण्याचं कारण शोधावं, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world