स्वानंद पाटील, बीड
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडवर कारवाईचा फास आवळला आहे. वाल्मिक कराडवर आज मकोका लावण्या आला आहे. वाल्मिक कराडवर झालेल्या या कारवाईनंतर कराड समर्थक सकाळपासूनच आक्रमक झाले आहेत. वाल्मिक कराडच्या पत्नी, आईसह अनेक जण आंदोलनाला बसले आहे. वाल्मिक कराडवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. मोठा पोलीस बंदोबस्त सध्या परिसरात पाहायला मिळत आहे.
संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कराड समर्थक आक्रमक झालेला पाहायला मिळाले. कराड समर्थकांना आत्मदहनाचा प्रयत्न केला. आधी एका महिलेने आणि एका कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. त्यानंतर आणखी एका समर्थकाने स्वत:ला पेटवून घेतले. त्यात त्याचा पाय भाजला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एका आंदोलकाला हृदयविकाराचा झटका
परळीत सध्या मोठा गोंधळ सध्या पाहायला मिळत आहे. परळी पोलीस ठाण्यासमोर सुरू असलेल्या आंदोलनातील एका आंदोलकाला हृदयविकाराचा झटका आला आहे. शेख एजाज मलिकपुरा असे नाव त्याचे नाव असून त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
वाल्मिक कराडला 14 दिवसांचा न्यायालयीन कोठडी
वाल्मीक कराड याची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्याचबरोबर कराड याच्यावर मकोका देखील लावण्यात आलेला आहे. त्यामुळे आजची रात्र कराडला बीड जिल्हा कारागृहात काढावी लागणार आहे. उद्या एसआयटीकडून कराड याला पुन्हा न्यायलात हजर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एसआयटी उद्या कराड याची पोलीस कोठडी मागणार आहे.