Waqf Amendment Bill : 'वक्फबद्दल चुकीची माहिती पसरवली', इस्लाम धर्माच्या अभ्यासकांकडून 3 महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा

इस्लाम धर्माचे अभ्यास पैंगबर शेख याबाबत म्हणाले की, वक्फ बोर्डामध्ये काही प्रमाणात भ्रष्टाचार होतो हे खरं आहे. मात्र देशात सर्वाधिक जागा वक्फ बोर्डाच्या आहे हे चुकीचं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Waqf Amendment Bill : वक्फ सुधारण विधेयक 2 एप्रिल रोजी लोकसभेत मांडलं जाणार आहे. वक्फबाबत सत्ताधारी नेत्यांकडून अनेक सवाल उपस्थित केले जात असताना वक्फ बोर्डाच्या अभ्यासकांकडून सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत देशातील प्रत्येक धर्माच्या तीर्थक्षेत्रांमध्ये वाढ झाली आहे. मात्र मुस्लिमांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वक्फ बोर्ड अभ्यासकांकडून केला जात आहे. याबाबत NDTV मराठीवर झालेल्या चर्चेदरम्यान अनेक गोष्टींचा उलगडा झाला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वक्फ बोर्ड अभ्यासक सलीम मुल्ला म्हणाले की, 1995 नंतर एकदाही वक्फ बोर्डाचा सर्व्हे करण्यात आला नाही. मात्र नवा सुधारणा कायदा आणून वक्फवर निर्बंध आणली जात आहेत. याशिवाय कटेक्टरशिवाय कोणत्याही संपत्तीवर वक्फ दावा करू शकत नाही. त्यामुळे वक्फ नियंत्रणाखाली नसल्याचा आरोप चुकीचा आहे. नव्या सुधारणेत वक्फमध्ये दोन सदस्य बिगर मुस्लीम असावेत असं सांगितलं जात आहे. मात्र देशातील हिंदू, ख्रिश्चन, शीख कोणाच्याही धार्मिक कायद्यात दुसऱ्या धार्मिक सदस्यांचा समावेश नसतो. मग मुस्लिमांबाबत असं का केलं जात आहे. बिगर मुस्लीमांना या धर्माविषयी काहीही माहिती नसल्यामुळे अडचणीचं ठरू शकतं. वक्फ ट्रिब्युनलमध्ये एखाद्या व्यक्तीच्या विरोधात निकाल लागला तरी त्याचा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Waqf Amendment Bill : वक्फ विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार; लोकसभेतील गणित कसं असेल?

इस्लाम धर्माचे अभ्यास पैंगबर शेख याबाबत म्हणाले की, वक्फ बोर्डामध्ये काही प्रमाणात भ्रष्टाचार होतो हे खरं आहे.

1. मात्र देशात सर्वाधिक जागा वक्फ बोर्डाच्या आहे हे चुकीचं आहे. आर्मीनंतर सर्वात जास्त चर्चच्या आहेत. मग रेल्वे आणि त्यानंतर वक्फच्या जागा सर्वाधिक आहे. वक्फ बोर्डापेक्षाही जास्त जागा हिंदू मंदिरांच्या आहेत. मात्र या जागा एका प्लॅटफॉर्मवर मोजल्या जात नसल्याने ते लक्षात येत नाही. याची राष्ट्रीय समिती नसल्याने त्यांच्या जागा किती हे कळत नाही. 

2. 9 लाख जागा वक्फ बोर्डाच्या असल्याचं म्हणलं जात आहे. मात्र या अधिकतर जागांवर अतिक्रमण आहे. हे अतिक्रमण हिंदू-मुस्लीम राजकीय नेत्यांचं आहे. 

Advertisement

3. तामिळनाडूमधील कुठलंही गाव वक्फ बोर्डाच्या नावावर नाही, हे धादांत खोटं आहे, असंही पैंगबर शेख यावेळी म्हणाले. 

भाजप नेत्या शायना एनसी यांनी वक्फमध्ये महिलांचं नेतृत्व नसल्याचा सवाल उपस्थित केला. वक्फच्या अनेक जागांवर भ्रष्टाचार करण्यात आला आहे. यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सुधारणा आवश्यक असल्याचं एनसी म्हणाल्या. 
 

Topics mentioned in this article