- अमेरिका इराक युद्धामुळे संपूर्ण जगात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवडा जाणवत आहे
- वर्ध्यामध्ये दहेगाव शिवारात संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह धाड टाकली
- पोलीसांनी २७३० लिटर पेट्रोल व डिझेल आणि २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
निलेश बंगाले
अमेरीका इराक युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. त्यामुळे सगळीकडेच सध्या पेट्रोल डिझेलसह गॅसचा तुटवडा जाणवत आहे. गेल्या काही दिवसात पेट्रोल डिझेलच्या किंमती ही वाढत चालल्या आहेत. अशा वेळी सरकारने पेट्रोल डिझेलची कमतरता नाही. कुणी ही साठेबाजी करू नये असे आवाहन केले होते. पण त्याचा काही एक परिणाम झालेला दिसत नाही. प्रत्येकालाच असुरक्षित वाटत आहे. पुढे काय होईल याचा विचार करून काही लोक नको त्या शक्कल लढवत आहेत. असाच एक प्रकार वर्ध्यामध्ये समोर आला आहे.
वर्ध्यातील दहेगाव शिवारात काही लोक संशयास्पद पद्धतीने हालचाल करत होता. त्यांची गडबड कुणाच्या ही नजरेतून सुटली नाही. ही बातमी पोलीसांपर्यंत पोहोचली. पोलीस ही अलर्टमोडवर आले. पोलिसांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना घेवून या शिवारात धाड टाकली. त्यावेळी तिथली स्थिती पाहून पोलीस आणि पुरावठा अधिकारी ही चक्रावून गेले. त्या शेतात जवळपास 2 हजार 730 लीटर डिझेल, पेट्रोलसह 2 लाख 85 हजार 759 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. इतक्या मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलचा साठा करून ठेवण्यात आला होता.
ही कारवाई दहेगाव परिसरात करण्यात आली. दहेगाव (स्टेशन) शिवारात काही इसमाची संशयीतरित्या हालचाल सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासह पोलीसांनी घटनास्थळ गाठले. तेथे 54 प्लास्टिक कॅनमध्ये अंदाजे 1620 लिटर डिझेल आणि 27 प्लास्टिक कॅनमध्ये अंदाजे 1110 लिटर पेट्रोल असे 2 हजार 730 लिटर डिझेल, पेट्रोल असा 2 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावरून पोलीसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सरकारने साठेबाजी करून नये असे आवाहन केले होते. शिवाय जे साठेबाजी करतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे आदेश ही दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ग्रामिण भागात पेट्रोल डिझेलची टंचाई जाणवत आहे. त्यामुळेच अशा घटना घडत आहेत. काही जण त्यामुळे पेट्रोल डिझेलचा साठा करून ठेवत आहे. त्याची विक्री ही डबल किंमतीत करून जास्तीचे पैसे कमवण्याचा उद्योग काहींनी सुरू केल्याचं याघटने वरून दिसत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world