जाहिरात

Kisan Maharaj Sakhare : वारकरी संप्रदायावर शोककळा, ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचं निधन

साखरे महाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर मोठी शोककळा पसरली आहे. 

Kisan Maharaj Sakhare : वारकरी संप्रदायावर शोककळा, ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचं निधन

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचं वयाच्या 89 व्या वर्षी काल रात्री दहाच्या सुमारास चिंचवड येथील एका खाजगी रुग्णालयांमध्ये दुःखद निधन झालं. साखरे महाराजांचे प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. 

साखरे महाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर मोठी शोककळा पसरली आहे. आज त्यांचं पार्थिव आळंदी येथील साधकाश्रम येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Comments

बातमी अपडेट होत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: