
एकीकडे उन्हाच्या काहिलीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विदर्भ, मराठवाड्यात पाऱ्याने 45 शी गाठली आहे. दुपारी तर घराबाहेर पडणंही कठीण झालं असताना राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.
(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पालघर, मुंबई, ठाणे जिल्ह्याला आजपासून (4 मे) तीन दिवस पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. रविवार, सोमवार आणि मंगळवार (4 ते 6 मे) या तीन दिवसांत दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तुरळक ठिकाणी पावसासोबत तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगाने वारे आणि विजेचा कडकडाट ढगांचा गडगडाट होऊ शकतो, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
नक्की वाचा - Badlapur News : बदलापूरकरांच्या डोक्याला 'ताप'; रेल्वेच्या तिकीट खिडकीमुळे मनस्ताप
राज्यातील या जिल्ह्यात यलो अलर्ट
याशिवाय रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा (घाट परिसर), संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय कोल्हापूर, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, धाराशिव या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट नसला तरी येथे हलक्या सरी बरसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे गुजरात, छत्तीगड आणि मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह वीट उत्पादक आणि फळ बागायतदारांचं नुकसान होऊ शकतं. अवकाळीमुळे भाताचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचंही टेन्शन वाढलं आहे.
गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा...
गुजरातमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गुजरातमधील अनेक जिल्ह्यात ७ ते ९ मेदरम्यान ढगांच्या गडगडाटासह तुफान पावसाची शक्यता आयएमडीकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटनासाठी गुजरातला जात असाल तर हवामानाचे अपडेट पाहून तिकीट बुकिंग करा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world