Western Railway: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी

Western Railway: पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Advertisement
Read Time: 1 min

पश्चिम रेल्वेची वाहतूक सोमवारी (3 जून) पहाटेपासूनच विस्कळीत झाली आहे. अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक उशीराने सुरू आहे. बोरिवली स्थानकात सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली आहे. अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक तब्बल 15 ते 20 मिनिटे उशीराने सुरू आहे.  लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेवर बिघाड झाल्याने प्रवाशांना मनस्ताप करावा लागत आहे. 

(नक्की वाचा: Toll Charges Hike: सर्वसामान्यांच्या खिशावर ताण, निवडणुका संपताच टोल दरात मोठी वाढ)

(नक्की वाचा: Amul Milk Price Hike: देशभरात अमूल दूध आजपासून महागले, जाणून घ्या नवे दर)

Topics mentioned in this article