महाराष्ट्रात महायुती आणि झारखंडमध्ये सोरेन सरकारला जनतेने स्पष्ट बहुमत दिलं आहे. महाराष्ट्रात तर महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. तर झारखंडमध्ये देखील इंडिया आघाडी सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा आहे. दोन्ही राज्यातील निवडणुकीच्या निकालात एक साम्य आहे. दोन्ही राज्यातील विजयात एक समाना धागा आहे. महिलांनी दोन्ही राज्यात भरभरुन मतदान केलं. हीच गोष्ट राज्यात महायुती आणि झारखंडमध्ये इंडिया आघाडीसाठी निर्णायक ठरली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दोन्ही राज्यांतील विजयासाठी महिलांसाठीच्या योजना प्रमुख कारण ठरल्या. दोन्ही राज्यात महिला मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झालेले पाहायला मिळालं. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी यावर्षी ऑगस्टमध्ये सुरू करण्यात आलेल्या 'लाडकी बहीण' योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये दरमाह देण्यात आले.
वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी कौटुंबिक उत्पन्न असलेल्या महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जात होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंतर मदतीची रक्कम 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. याशिवाय महिलांसाठी एसटीमध्ये निम्मे भाडे यासह अनेक योजना कामी आल्या.
(नक्की वाचा- Maharashtra New MLA : राज्यातील 288 नवीन आमदार कोण? वाचा संपूर्ण यादी)
मैय्या सन्मान योजना ठरली गेमचेंजर
झारखंडमध्ये हेमंत सोरेन सरकारने यावर्षी ऑगस्टमध्ये 'मैय्या सन्मान योजना' सुरू केली. ज्यामध्ये महिला मतदारांचा झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) कडे कल वाढला. या योजनेअंतर्गत 21 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. या योजनेचा फायदा राज्यभरातील सुमारे 50 लाख महिलांना होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
(नक्की वाचा - शिवसेना शिंदे गटाच्या या आमदाराला मिळणार मंत्रिपदाची संधी, खासदार श्रीकांत शिंदेंचे संकेत)
महिला मतदारांचा वाढलेली संख्या ठरली निर्णायक
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 65.21 टक्के महिलांनी मतदान केले, तर पुरुषांनी 66.84 टक्के मतदान केले. 2019 मध्ये 62.77 टक्के पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर महिलांनी 59.2 टक्के मतदान केले.
झारखंडमध्ये तर महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती. 81 पैकी 68 जागांवर महिलांनी जास्त मतदान केले. नोंदणीकृत 2.61 कोटी मतदारांपैकी 1.76 कोटींहून अधिक लोकांनी मतदान केले. त्यात 1.29 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की 91.16 लाख महिला मतदारांनी मतदान केले, जे पुरुषांच्या मतदानापेक्षा 5.52 लाख अधिक आहे.