Punjabrao Dakh's prediction: महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत. प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात 23 व 24 सप्टेंबर रोजी काही भागांत जोरदार पाऊस पडणार आहे. त्यानंतर 25 आणि 26 सप्टेंबर रोजी राज्यात वातावरण कोरडे राहून चांगल्या सूर्यप्रकाशाची शक्यता आहे. मात्र, 27 ते 30 सप्टेंबर या कालावधीत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, 23 आणि 24 सप्टेंबर रोजी दिवसा ऊन पडेल आणि रात्रीच्या वेळी जोरदार पाऊस होईल. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात ही परिस्थिती कायम राहील, तर उत्तर महाराष्ट्रातही दिवसा ऊन आणि रात्री पावसाचे वातावरण असेल. विदर्भात देखील भाग बदलत पाऊस पडेल, असे डख यांनी नमूद केले आहे. या पावसात पाण्याचा वेग जास्त असण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे.
(नक्की वाचा- Maharashtra Rain: राज्य सरकारची मोठी घोषणा, अतिवृष्टीने हतबल बळीराजाला दिलासा)
कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर?
पावसाचा जोर कोणत्या जिल्ह्यात जास्त असेल, याची माहिती देताना पंजाबराव डख यांनी नांदेड, परभणी, लातूर, जालना, बीड, धाराशिव, अहमदनगर, सातारा, पुणे, संगमनेर (अहमदनगर), जळगाव या जिल्ह्यांमध्ये तसेच मुंबई, नाशिक आणि नंदुरबारमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. विदर्भ आणि पश्चिम विदर्भात ज्या भागांत अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही, त्या भागांत आता जोरदार पाऊस होऊन हा मान्सूनचा शेवटचा टप्पा पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.
नदीकाठच्या गावांना इशारा
27 ते 0 सप्टेंबर दरम्यान येणारा पाऊस हा मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा असू शकतो. काही ठिकाणी रिमझिम, तर काही ठिकाणी ओढे-नाले भरून वाहतील असा अंदाज आहे. या कालावधीत नदीकाठच्या लोकांना विशेष इशारा देण्यात आला आहे. त्यांनी आपली जनावरे नदीच्या काठावर बांधू नयेत आणि पाईपलाईन आधीच सुरक्षित ठिकाणी काढून ठेवावीत. धरण क्षेत्रात अधिक पाऊस झाल्यामुळे धरणातून पाणी सोडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नदीकाठावरील गावांमध्ये पाणी शिरू शकते, असेही डख यांनी सांगितले आहे.
(नक्की वाचा- Pune News: पुणेकरांनो वाहतुकीचे नियम पाळा! दोन तरुणांना 'ड्रंक अँड ड्राईव्ह'प्रकरणी अद्दल घडवणारी शिक्षा)
दसऱ्यानंतर वातावरण बदलणार
शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे, 30 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. यामुळे सोयाबीन काढणीसाठी शेतकऱ्यांना संधी मिळेल. ख यांनी शेतकऱ्यांना दुपारी सोयाबीन कापून वाळल्यावर लगेच झाकून ठेवण्याचा