जाहिरात

Pune News: पुणेकरांनो वाहतुकीचे नियम पाळा! दोन तरुणांना 'ड्रंक अँड ड्राईव्ह'प्रकरणी अद्दल घडवणारी शिक्षा

Pune News: पुण्यातील या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांना एक कडक संदेश देण्यात आला आहे. न्यायालयाने दारू पिऊन वाहन चालवल्याच्या आरोपाखाली दोन्ही चालकांना दोषी ठरवले आहे.

Pune News: पुणेकरांनो वाहतुकीचे नियम पाळा! दोन तरुणांना 'ड्रंक अँड ड्राईव्ह'प्रकरणी अद्दल घडवणारी शिक्षा

Pune News: पुणे  शहरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयाने दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या दोन चालकांना कारावासाची आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांना एक कडक संदेश देण्यात आला आहे. न्यायालयाने दारू पिऊन वाहन चालवल्याच्या आरोपाखाली दोन्ही चालकांना दोषी ठरवले आहे.

पहिल्या प्रकरणात, न्यायाधीश एस. बी. पाटील यांनी पिंपळे गुरव येथील रहिवासी असलेल्या 29 वर्षीय रोहित शैलेंद्र वर्मा याला 15 दिवसांची साधी कैद आणि 12,000 रुपयांचा दंड ठोठावला. वाहतूक पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम 184, 185, आणि 3/181 अंतर्गत त्याच्यावर 4979/2024 हा गुन्हा दाखल केला होता.

(नक्की वाचा- Pune Mhada: पुण्यात म्हाडाची मोक्याच्या ठिकाणी स्वस्तात मस्त घरं, अर्ज करताना किती पैसे भरावे लागणार?)

दुसऱ्या एका प्रकरणात, याच न्यायालयाने नांदेड सिटी, पुणे येथील 31 वर्षीय राजकुमार मांगीणी कुलाल याला 15 दिवसांची साधी कैद आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावला. त्याच्यावरही वाहतूक विभागाने मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 आणि 185 अंतर्गत 01/2025 हा गुन्हा दाखल केला होता.

पुण्यात वाढते 'ड्रंक अँड ड्राईव्ह'चे गुन्हे

पुणे शहरात गेल्या काही वर्षांत दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. वाहतूक उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये 2,017, 2021 मध्ये 69, 2022 मध्ये 37, 2023 मध्ये 562 आणि 2024 मध्ये 5,293 गुन्हे दाखल झाले होते. यावर्षी आतापर्यंत (2025) 3,948 गुन्हे दाखल झाले आहेत.

(नक्की वाचा-  Aadhaar Card Update: आधारमध्ये पत्ता, नाव बदलायचेय? मोफत आणि एका क्लिकवर होईल काम, फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा)

या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, पुण्यात दारू पिऊन गाडी चालवण्याच्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पोलिसांनी आणि न्यायालयाने यावर कठोर भूमिका घेतल्यामुळे अशा बेदरकार चालकांवर नक्कीच वचक बसेल. दोन्ही प्रकरणांमध्ये सरकारी वकील वर्षा राणी जाधव यांनी सरकारची बाजू मांडली, तर पोलीस निरीक्षक रुनाल मुल्ला आणि पीएसआय विकास पाटील यांनी कार्यवाहीचे पर्यवेक्षण केले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com