Satara News : प्रशासनाचा आदेश धाब्यावर, सेल्फी प्रेमी तरुणी दरीत पडली

ठोसेघर रस्त्यावरील बोरणे घाटात अशी एक घटना घडली असून सेल्फी घेण्याच्या नादात तरुणी दरीत पडली. तरुणीला वन समिती होमगार्डच्या युवकांनी दरीतून बाहेर काढले.

Advertisement
Read Time: 2 mins

सुजित आंबेकर, सातारा

सेल्फी घेताना अपघात झाल्याच्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत. मात्र अनेकजण यातून काहीही बोध घेत नाहीत. असाच एक प्रकार साताऱ्यातून समोर आला आहे.  सेल्फी काढण्याच्या नादात एक तरुणी खोल दरीत पडली. सुदैवाने तिला दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र पर्यटनस्थळांवरील पर्यटकांचा बेशिस्तपणा यातून पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू आहे. पर्यटन स्थळे, धबधब्यांवर पर्यटकांना येण्यास बंदी आहे. मात्र अतिउत्साही पर्यटक जीव धोक्यात घालून धबधब्याकडे जात आहेत. ठोसेघर रस्त्यावरील बोरणे घाटात अशी एक घटना घडली असून सेल्फी घेण्याच्या नादात तरुणी दरीत पडली. तरुणीला वन समिती होमगार्डच्या युवकांनी दरीतून बाहेर काढले.

नक्की वाचा- गटारी पार्टी जीवावर बेतली; 5 मित्र गाडीसह नदीत बुडाले, एकाचा मृत्यू तर एकजण बेपत्ता

सविस्तर घटना अशी की, मायणी येथील रूपाली देशमुख ही 29 वर्षीय तरुणी तिच्या मित्रांसोबत मान्सून पर्यटनासाठी सज्जनगड, ठोसेघरकडे आली होती. त्यावेळी बोरणे घाटातील कठड्यावर ती फोटोसेशन करत होती. फोटोसेशन करत असतानाच सेल्फी काढण्याच्या नादामध्ये रुपालीचा तोल जाऊन ती 50 ते 60 फूट दरीत पडली.

घटनेची माहिती मिळताच ठोसेघर वन समितीचे प्रवीण चव्हाण, प्रथमेश जानकर, प्रतिक काकडे, रामचंद्र चव्हाण तसेच होमगार्ड अविनाश मांडवे, सागर मदने यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर आपला जीव धोक्यात घालून होमगार्ड अविनाश मांडवे हे दोरीने खाली उतरून त्यांनी या तरुणीला दरीतून बाहेर काढले.

Advertisement

(नक्की वाचा - "मी ढेकणाला आव्हान देत नाही", उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर नाव न घेता टीका)

पुढील उपचारासाठी तरुणीला खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या या परिसरात पर्यटकांना येण्यासाठी नो एन्ट्री आहे. मात्र पर्यटक पोलिसांना चकवा देऊन या परिसरात येत आहेत. असे बेशिस्त पर्यटक नियमांचा भंग करुन फिरायला येतात आणि प्रशासनाचीही डोकेदुखी वाढवत आहे. त्यामुळे प्रशासनानेही अशा पर्यटकांविरोधत कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article