Who is Deepak Kate: प्रविण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणार दीपक काटे कोण आहे?

सर्वात गंभीर बाब म्हणजे दीपक काटेवर हत्येचा आरोप आहे. शेतीच्या वादातून दीपक काटेने सख्ख्या चुलत भावाची हत्या केल्याचा आरोप आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Who is Deepak Kate: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर शाईफेक प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. प्रविण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणाऱ्या दीपक काटेसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत आहे. तर प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याशी भाजपचा संबंध नाही. तसेच अशा पातळीवर उतरून हल्ला करणे भाजपच्या संस्कृतीत नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.   

कोण आहे दीपक काटे? 

प्रविण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणारा दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी आहे. दीपक काटेच्या फेसबूक अकाऊंटवरून देखील स्पष्ट होत आहे की तो भाजपचाच पदाधिकारी आहे. त्याच्या अनेक फोटोंवरून देखील त्याचा भाजपशी संबंध अधोरेखित होतो. 

(नक्की वाचा- Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर हल्ला, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल)

दीपक काटे शिवधर्म फाउंडेशन नावाची संस्था चालवतो. याच माध्यमातून त्याने काही आंदोलने देखील केली आहेत. दीपक काटेच्या आंदोलनानंतरच संभाजी बिडीचं नाव बदलण्यात आलं होतं. संभाजी ब्रिगेडच्या नावाला देखील दीपक काटेच्या शिवधर्म फाउंडेशन विरोध होता.

सर्वात गंभीर बाब म्हणजे दीपक काटेवर हत्येचा आरोप आहे. शेतीच्या वादातून दीपक काटेने सख्ख्या चुलत भावाची हत्या केल्याचा आरोप आहे. त्या गुन्ह्यात तो सात वर्षे येरवडा कारागृहामध्ये होता. अशा गुंड प्रवृत्तीच्या दीपक काटेवर आता काय कारवाई होणार हे पाहणे देखील औत्सुक्याचे आहे. 

Advertisement

(नक्की वाचा- Sambhaji Brigade: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना फासलं काळं)

सुषमा अंधारे यांची टीका

प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा आरोपी दीपक काटे रेकॅार्डवरील गुन्हेगार आहे. भाजपाचा सक्रिय पदाधिकारी आहे. बावनकुळेंचा निकटवर्तीय आहे. या कामगिरीसाठी एखादी आमदारकी/खासदारकी/महामंडळ देऊनच टाका.. भाजपच्या पात्रता चाचणी परीक्षेत पोरगा अव्वल नंबराने पास झालाय, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. 

Topics mentioned in this article