Who is Deven Bharti: मुंबईला मिळाले नवे पोलीस आयुक्त! डॅशिंग, धडाकेबाज, CM फडणवीसांचे खास, कोण आहेत देवेन भारती?

Mumbai Police Commissioner Deven Bharti Profile: मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी रितेश कुमार, अमिताभ गुप्ता, संजीवकुमार सिंघल यांचीही नावे चर्चेत होती. अखेर आता देवेन भारती यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

New Mumbai Police Commissioner: मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे आज (30 एप्रिल) सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीनंतर मुंबई पोलीसची जबाबदारी कोणाकडे जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याबाबत आता सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली असून देवेन भारती यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी रितेश कुमार, अमिताभ गुप्ता, संजीवकुमार सिंघल यांचीही नावे चर्चेत होती. अखेर आता देवेन भारती यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोण आहेत देवेन भारती?

देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. 4 जानेवारी 2023 रोजी देवेन भारती यांची मुंबई पोलिस दलाच्या इतिहासातील पहिल्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली. हे पद नव्याने निर्माण करण्यात आले असून सर्व सहपोलीस आयुक्त त्यांना अहवाल देतात, तर ते मुंबई पोलीस आयुक्तांना अहवाल देतात.
  तसेच यापूर्वी त्यांनी *सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था), अतिरिक्त पोलीस महासंचालक (दहशतवाद विरोधी पथक) आणि  महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक यांसारख्या महत्त्वाच्या भूमिका सांभाळल्या आहेत.

Advertisement

डिसेंबर 2022 मध्ये ते सहपोलीस आयुक्त (वाहतूक) म्हणून कार्यरत होते. देवेन भारती यांचा 26/11 मुंबई दहशतवादी  हल्ल्याच्या तपासात सहभाग होता. त्याचबरोबर मिड-डे' वृत्तपत्राचे वरिष्ठ गुन्हे संपादक जे. डे यांच्या हत्येच्या तपासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच इंडियन मुजाहिद्दीन  या दहशतवादी संघटनेचा कणा मोडण्यात त्यांचे योगदान मानले जाते.

Advertisement

(ट्रेंडिंग बातमी - काहीतरी मोठे घडणार ? CDS आणि NSA ची पंतप्रधानांसोबत बैठक)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास...

देवेन भारती हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. फडणवीस मुख्यमंत्री असताना (2014-2019) त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना वाहतूक विभाग आणि सुरक्षा महामंडळासारख्या तुलनेने कमी प्रभावी पदांवर नियुक्त केले गेले.  शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईत विशेष पोलीस आयुक्त हे नवीन पद निर्माण केले, ज्यावर भारती यांची नियुक्ती झाली. या नियुक्तीमुळे पोलीस खात्यात आणि राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली होती.

Advertisement

(ट्रेंडिंग बातमी - Pahalgam attack: पाकिस्तानचा मोठा डाव फसला, करायला गेले एक अन् झालं भलतचं)