बंदुकीच्या जागी हातात वही पेन आला! नक्षलग्रस्त भागातील अवलिया मास्तरची जिगरबाज कथा

शिक्षक किंवा अधिकारी अशा दुर्गम भागात जाण्यात कचरतात. काही जण गेलेच तर दोन-सहा महिन्यात बदली करून घेतात. पण मंतय्या चिन्नी बेडके यांनी तसं केलं नाही.

Advertisement
Read Time: 4 mins
गडचिरोली:

मनीष रक्षमवार

शिक्षक हा खऱ्या अर्थाने पुढची पिढी घडवत असतो. शिक्षकाच्या जोरावर अनेक विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहोचतात आणि समजात मोठी कामगिरी करून दाखवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवनात शिक्षण जेवढे महत्वाचे आहे, तेवढेच महत्वाचे आहे चांगला शिक्षक मिळणे. चांगला शिक्षक ज्या विद्यार्थ्यांना मिळाला त्यांचे आयुष्यच बदलून गेले. याची अनेक उदाहारणे समोर आहेत. त्या पैकीच एक आहेत मतंय्या बेडके. मतंय्या हे गडचिरोली जिल्ह्यातील एटाप्पली या नक्षल प्रभावीत जिल्ह्यात जाजावंडी  इथल्या शाळेचे शिक्षक आहेत. त्यांना नुकताच आदर्श राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. त्यांनी नक्षलग्रस्त दुर्गम भागात शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाला खरोखरच तोड नाही. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने या पुरस्काराचे मानकरी ठरतात. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एटापल्ली तालुक्यातील 'छोटा काश्मिर' म्हणुन जाजावंडी हे अतिदुर्गम भागात असलेले गाव आहे. या गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. जाजावंडी हे गाव गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 210 किलोमीटरवर आहे. तर  एटापल्ली तालुक्याच्या ठिकाणापासून 45 किलोमीटर अंतरावर आहे. येथे नक्षलवाद्यांच्या वारंवार चकमकी होत असतात. थोडक्यात नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात असलेले हे गाव आहे. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात तर विचारायची सोय नाही. अशा गावातल्या शाळेवर मतंय्या मास्तर हे 14 वर्षापूर्वी रूजू झाले. त्यावेळी शाळेची स्थिती फारशी चांगली नव्हती. विद्यार्थ्यांना शोधून आणावे लागत होते. अजूबाजूच्या परिसरातील शाळा विद्यार्थी संख्ये अभावी बंद होत होत्या. अशा वेळी जाजावंडीची शाळा सुरू ठेवण्याचे आव्हान मतंय्या मास्तरां समोर होते. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री म्हणाले, पुतळा कोसळण्यासाठी वारा दोषी; पण काय आहे परिस्थिती? स्थानिकांचा खुलासा

जेव्हा ते शाळेत रूज झाले तेव्हा विद्यार्थी संख्या होती केवळ 10. त्यामुळे ही विद्यार्थी संख्या वाढवण्याचे आव्हान त्यांच्या समोर होते. इथे असणाऱ्या मुलांची मुळ भाषा होती गोंड. त्यामुळे त्यांनी गोंड भाषेतून विद्यार्थ्यांना मराठी शिकवायला सुरूवात केली. मुलांना ते समजू लागले. पुढे त्यांनी शाळेत विवीध उपक्रम सुरू केले. त्यात खेळ, संगीत, चित्रकला यावर भर दिला. त्यामुळे मुलांना शाळेची हळूहळू आवड निर्माण झाली. पुढे त्यांनी शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेतला. शाळेत कम्प्युटर आले. टिव्ही आला. ऑनलाईन शिक्षणही त्यांनी स्वताच्या पुढाकाराने सुरू केले. कधी न पाहीलेल्या गोष्टी आदिवासी मुलांनी शाळेत पाहीला. त्यातून शिक्षण देण्यास सुरूवात केली. शाळेची पटसंख्या हळुहळू वाढत गेली.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार आपटेंनी तेव्हाच व्यक्त केली होती भीती, पण तरीही दुर्लक्ष?

शाळेची पटसंख्या 10 वरून आता 138 वर पोहोचली आहे. पहिले चौथी पर्यंत असलेले वर्ग आता सातवी पर्यंत झाले आहे. मास्तर यावर थांबले नाहीत. आदिवासी मुलांना चांगले इंग्रजी यावे यासाठी त्यांनी केरळ मधून दोन शिक्षक बोलवले. लोकवर्गणी गोळी केली. त्यातून या शिक्षकांच्या राहाण्याची आणि पगाराची सोय त्यांनीच केली. उद्देश एकच आदिवासी मुलांना चांगले इंग्रजी यावे. आज ही मुले इंग्रजीचेही धडे गिरवत आहेत. एक शिक्षक असलेल्या शाळेवर बेडके गुरूजींमुळे चार शिक्षक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी शिक्षणाची इतकी आवड निर्माण झाली की आता आजूबाजूच्या वाड्या पाड्यांवरील मुलेही शाळेत शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. शाळेची गुणवत्ता वाढावी यासाठी ते प्रयत्न करत आहे. मुलांचे काही तरी चांगले होत आहे हे पाहून गावकरीही मदत करत आहेत. लोकवर्गणीतून शाळेत नवनवे उपक्रम राबवले जात आहेत.    

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - मोहन भागवतांना आता पंतप्रधान मोदींच्या दर्जाची सुरक्षा, अचानक का केले बदल?

मंतय्या चिन्नी बेडके हे मुळचे गडचिरोलीचेच आहेत. आदिवासी समाजाची फरफट त्यांना चांगलीच माहित आहे. त्यामुळे या समाजाची सेवा करण्याचे त्यांनी ठरवले. त्यांना त्यांची गोंड भाषा येत असल्याचा त्यांना फायदा झाला. बेडके यांनी मास्टर ऑफ आर्ट्स, डिप्लोमा इन एज्युकेशन, डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन, बॅचलर ऑफ एज्युकेशन, डिप्लोमा इन अॅग्रिकल्चरल सायन्स या पदव्या घेतल्या आहेत. त्यांनी आपल्या ज्ञानाचा व्यावसायिक जीवनात पूर्णपणे वापर केला आहे. त्यांनी विचार केला असता तर नागपूर सारख्या शहरात त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असती. पण त्यांनी दुर्गम अशा एटापल्ली भागात काम करण्याचं ठरवलं. नुसतं काम केलं नाही तर बदलही करून दाखवे. 

ट्रेंडिंग बातमी - सिडकोची लॉटरी, स्वप्नातल्या घराच्या किंमती कितीने वाढल्या?

आज त्यांच्या मुळे दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात येवू शकले आहेत. त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण झाली आहे. ज्या भागातले तरूण नक्षली चळवळीकडे वळतात त्यांच्या हातात वही पेन देवून बेडके गुरूजींनी मोठे काम केले आहे. अनेक शिक्षक किंवा अधिकारी अशा दुर्गम भागात जाण्यात कचरतात. काही जण गेलेच तर दोन-सहा महिन्यात बदली करून घेतात. पण मंतय्या चिन्नी बेडके यांनी तसं केलं नाही. त्यांनी शिक्षक पेशा फक्त नोकरी म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून पार पाडला आहे. त्याचीच फळ आज जाजावंडी गावातील विद्यार्थी चाखत आहेत. अजून अनेक गोष्टी करायच्या आहेत. पल्ला लांबचा आहे पण अशक्य नाही असं बेडके गुरूजी सांगतात.